दुमका (झारखंड) – येथे स्पेन देशातील एका ३० वर्षीय महिलेवर ७-८ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. येथील कुरमहाट परिसारात १ मार्चच्या रात्री ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी ४ जणांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी चालू केली आहे. ही महिला तिच्या पतीसह पर्यटक म्हणून भारतात आली आहे. हे दांपत्य प्रथम पाकिस्तानात गेले होते, तेथून बांगलादेशमार्गे झारखंडमधील दुमका येथे पोचले होते.
Gang Rape of Spanish Woman in Jharkhand.
It is shameful for India that not only Indian but also foreign women are being raped in the country. It has become essential for the Government, irrespective of party affiliations, to view this matter with seriousness and adopt a… pic.twitter.com/43wcddTl2c
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 2, 2024
१. पर्यटक म्हणून येथे फिरतांना रात्र झाली; म्हणून ही महिला कुरमाहाट परिसरातील एका शेतातील तंबूत पतीसह आराम करत होती. त्या वेळी हा प्रकार घडला. विरोध केला असता तिला आणि तिच्या पतीला मारहाणही करण्यात आली. पोलिसांनी महिलेला रात्री उशिरा सरैयाहाट सामुदायिक आरोग्य केंद्रात नेले. जिथे तपासात महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची पुष्टी झाली.
(सौजन्य : Zee News)
२. भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणावर राज्यातील झारखंड मुक्ती मोर्चा सरकारवर टीका केली. ते म्हणाले सरकारने गेल्या ४ वर्षांत कोणत्याही प्रशिक्षणाविना येथे पोलीस अधिकारी नियुक्त करून खून, दरोडे आणि बलात्कार यांना प्रोत्साहन दिले आहे. आदिवासी लोकसंख्या सातत्याने अल्प होत आहे. येथील संपूर्ण पोलीस प्रशासन तत्काळ पालटून या पोलीस कर्मचार्यांनाच तुरुंगात पाठवावे.
#WATCH | Deoghar, Jharkhand: On the alleged Spanish women gang rape case, BJP MP Nishikant Dubey says, “…In this state, neither Adivasis nor Dalits are safe…Now this has become an international matter that a Spanish woman comes with her husband to India, and it comes to light… pic.twitter.com/pGCMXJkBTw
— ANI (@ANI) March 2, 2024
संपादकीय भूमिकाभारतीयच नाही, तर विदेशी महिलांवरही भारतात बलात्कार होत आहेत, हे भारताला लज्जास्पद ! आतातरी सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी याकडे गांभीर्याने पहात कठोर होणे आवश्यक ठरले आहे ! |