सद्यःस्थितीत साधनेला पर्याय नाही !

उत्तरप्रदेशमध्ये एका कुटुंबाला त्यांचा २२ वर्षांपूर्वी हरवलेला मुलगा असल्याचे भासवून नफीस नावाच्या व्यक्तीने त्या कुटुंबाकडून लाखो रुपये उकळण्याचा प्रयत्न करण्यात आला; पण तो प्रयत्न फसल्याचे वाचनात आले. यानिमित्ताने सध्या हिंदूंना किती सावध रहाणे आवश्यक आहे, हे जाणवले.

१. घरातील सुख-दु:खाच्या घटना, आर्थिक व्यवहार, परस्पर नातेसंबंध, आजारपणे अशी खासगी माहिती अपरिचित लोकांपर्यंत पोचणार नाही, याची काळजी घेणे.

२. दैनंदिन जीवनात खरेदी-विक्री करतांना आपण कुणाशी व्यवहार करत आहोत ? ज्यांच्याशी व्यवहार करत आहोत ते कोण आहेत ? आपल्या परिसरात ते कधीपासून आहेत ? ते देशविघातक किंवा बेकायदेशीर कृत्यात सहभागी असतात का ? यांचे भान ठेवणे.

३. लव्ह जिहादसारख्या घटना घडू नयेत, यासाठी सावधानता म्हणून घरातील आणि इतर परिचित मुली अन् महिला यांचे संपर्क क्रमांक वा छायाचित्रे समाजमाध्यमांवर प्रसारित होणार नाहीत. यासह भ्रमणभाष रिचार्ज करणारे, पार्सल आणून देणारे , कॅबवाले, वाहन दुरुस्ती करणारे यांच्याशी घरातील महिलावर्गाचा कमीत कमी संबंध येईल, याची काळजी घेणे.

४. ‘वक्फ’सारख्या कायद्याद्वारे भूमीवर होणारे अतिक्रमण रोखण्यासाठी डोळ्यात तेल घालून सावध रहाणे.

५. कुठलीही उत्पादने खरेदी करतांना हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणित नाहीत ना ? याचे भान ठेवणे.

६. आपली मुले दिवसभरात कुणाच्या संपर्कात येतात ? त्यांच्या मित्र-मैत्रीणी कोण आहेत ? यांवर लक्ष ठेवणे.

सध्याची आजूबाजूची परिस्थिती पाहिली, तर वर उल्लेख केलेल्या गोष्टींचे भान ठेवत जगणे पुष्कळ कठीण झाले आहे. परिणामी यामुळे अनेकांना मानसिक तक्रारी भेडसावत आहेत. हिंदूंना सद्यःस्थितीत जगण्यासाठी साधनेला पर्याय नाही; कारण त्यातून आत्मबळ मिळते आणि प्रसंगांना तोंड देण्याची शक्ती मिळते.

– श्री. अनिकेत शेटे, चिंचवड, जिल्हा पुणे.