विजयपूर (कर्नाटक) येथे हिंदु बंदीवानांनी २२ जानेवारीला कारागृहात श्रीरामोत्सव साजरा केल्याने मुसलमान बंदीवानांनी केले आक्रमण !

मुसलमान कारागृह अधीक्षकांच्या चिथावणीवरून आक्रमण करण्यात आल्याचा होत आहे आरोप !

विजयपूर (कर्नाटक) – अयोध्येतील श्रीराममंदिरात श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत असतांना येथील मध्यवर्ती कारागृहात हिंदु बंदीवानांकडून पूजा केली जात होती. त्या वेळी कारागृहाच्या काही मुसलमान पोलीस अधिकार्‍यांनी कारागृह अधीक्षकांच्या आदेशाने मुसलमान बंदीवानांच्या माध्यमांतून या हिंदु बंदीवानांवर आक्रमण घडवून आणल्याची घटना घडली आहे. याविषयी हिंदु बंदीवानांनीच माहिती दिल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे.

या कारागृहात महाराष्ट्रातील बंदीवान परमेश्‍वर जाधव, रमेश दळवी आणि प्रदीप माने यांनी २२ जानेवारीला श्रीरामोत्सव साजरा केला. त्यामुळे संतापलेल्या कारागृह अधीक्षकांनी बंदीवान शेख अहमद आणि अन्य मुसलमान बंदीवान यांना कार्यालयात बोलावून या हिंदु बंदीवानांवर आक्रमण घडवून आणले, असा आरोप केला जात आहे. या आक्रमणाला कारागृहातील अन्य मुसलमान अधिकार्‍यांनीही साथ दिली. या संदर्भातील व्हिडिओ सामाजिक माध्यमांमध्ये प्रसारित झाला असून हिंदूंकडून संताप व्यक्त होत आहे. हिंदु संघटनांनी मुसलमान कारागृह अधीक्षकाची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली आहे.

संपादकीय भूमिका

  • काँग्रेसचे राज्य म्हणजे तालिबानी राजवट, हे प्रतिदिन वेगवेगळ्या घटनांमधून लक्षात येत आहे. काँग्रेसला मत देऊन सत्तेवर बसवल्यावर काय होते, हे हिंदूंना आतातरी लक्षात राहील ना ?
  • धर्मांध मुसलमान हे सरकारी अधिकारी पदावर बसल्यावर ते राज्यघटनेनुसार नाही, तर धर्मानुसार वागतात, हे लक्षात घेऊन अशांना वरिष्ठ पद द्यायचे का ? यावर चर्चा झाली पाहिजे !