Ayodhya Ram Temple Suryavanshi : श्रीराममंदिरासाठी अयोध्येतील सूर्यवंशी समाजाने ५०० वर्षे पगडी परिधान केली नाही !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – अयोध्येतील श्रीराममंदिरासाठी गेल्या ५०० वर्षे हिंदूंनी लढा दिला आहे. ‘श्रीराममंदिराच्या उभारणीत आपलेही योगदान असावे’, यासाठी प्रत्येकाने स्वतःच्या क्षमतेनुसार लढा दिला, तर काहींनी त्यासाठी व्रत केले किंवा काहींनी विविध प्रकारचे निश्‍चयही केले होते. यांची माहिती आता समोर येत आहे.

अयोध्येपासून १५ कि.मी. अंतरावर असणार्‍या सरायवंशी गावातील सूर्यवंशी नागरिकांनी ‘जोपर्यंत श्रीराममंदिर बांधले जात नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी आणि पायामध्ये चामड्याच्या चपला घालणार नाही’, अशी शपथ ५०० वर्षांपूर्वी घेतली होती. त्यांच्या अनेक पिढ्यांनी श्रीराममंदिरासाठी बलीदान दिले आहे. आता त्यांची शपथ पूर्ण होत असल्याने ते आनंदी आहेत. या समाजाचे म्हणणे होते की, जर प्रभु श्रीराम त्यांच्या स्थानावर विराजमान होऊ शकत नसतील, तर आम्ही सुखासीन आयुष्य कसे जगू शकतो ?