साधकांनो, एखाद्या साधकाला तीव्र आध्यात्मिक त्रास होत असल्याचे ध्यानी आल्यास तत्परतेने पुढील आध्यात्मिक उपाय श्रद्धापूर्वक करा !

‘हिंदु धर्मजागृती सभा, शिबिर आदी कार्यक्रमांमध्ये किंवा अन्य वेळी अनिष्ट शक्ती साधकांना तीव्र त्रास देतात. त्यामुळे साधकांच्या आध्यात्मिक त्रासात पुष्कळ वाढ होते. अशा वेळी तेथे असलेल्या अन्य साधकांनी तत्परतेने पुढील आध्यात्मिक स्तरावरील उपाय करावेत. 

१. स्वतः प्रार्थना आणि नामजप करून आध्यात्मिक स्तरावरील त्रास होत असलेल्या साधकालाही तसे करण्यास सांगावे.

२. त्या साधकाभोवती उपायांसाठी खोकी ठेवावी.

३. प.पू. भक्तराज महाराज यांची भजने हळू आवाजात लावावी.

४. या साधकांसाठी सात्त्विक अत्तर, कापूर, गोअर्क, तसेच विभूती यांचे उपाय केल्यास काही वेळा उत्पादनांतील सात्त्विकतेमुळे साधकांच्या आध्यात्मिक त्रासाचे प्रमाण वाढते. अशा वेळी आध्यात्मिक त्रास न्यून होईपर्यंत प्रार्थना, नामजप करणे आणि खोकी, तसेच भजने लावणे, एवढेच उपाय करावेत.

५. आवश्यक ते अन्य उपाय करण्याविषयी उत्तरदायी साधकांनाही विचारून घ्यावे.

दिवसेंदिवस संकटकाळाची तीव्रता वाढत असून अनिष्ट शक्ती राष्ट्र आणि धर्म यांच्या कार्यात अडथळे आणण्यासाठी निकराने प्रयत्न करत आहेत. ईश्वर सर्वशक्तीमान असल्याने तो प्रत्येक क्षणी साधकांना साहाय्य करतच असतो. त्यामुळे साधकांनी अशा प्रसंगी डगमगून न जाता स्थिर राहून श्रद्धेने सर्व आध्यात्मिक उपाय करावेत.’