पैशांची देवाण-घेवाण, आर्थिक किंवा भूमीचे व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी वैयक्तिक गोष्टी आपल्या जबाबदारीवर कराव्यात !

साधकांना सूचना आणि वाचक अन् हितचिंतक यांना विनंती !

सनातन संस्था गेली २५ वर्षे अध्यात्मप्रसाराचे कार्य करत आहे. या कालावधीत साधक, वाचक, हितचिंतक यांचा परस्पर परिचय होऊन ते अध्यात्म अन् साधना यांसह वैयक्तिक स्तरावर काही व्यवहार करत असल्यासे निदर्शनास आले आहे. यामध्ये उसने पैसे देवाण-घेवाण करणे, कर्ज काढण्यास साहाय्य करणे किंवा जामीन रहाणे, भूमी खरेदी-विक्री व्यवहार करणे, तसेच विवाह जुळवणे आदी गोष्टी सामाजिक भावनेतून घडत आहेत.

सनातन संस्था अध्यात्मप्रसार, समाजसाहाय्य आणि राष्ट्ररक्षण यांसाठी कार्यरत आहे. यामध्ये वैयक्तिक हितसंबंध जोपासणे स्वाभाविकपणे येत नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आर्थिक व्यवहार, भूमी खरेदी-विक्री करणे किंवा विवाह जुळवणे यांसाठी संबंधितांनी वैयक्तिक स्तरावर पुरेशी काळजी घेऊन ते स्वत:च्या जबाबदारीवर करावेत, ही नम्र विनंती आहे.

– व्यवस्थापकीय  विश्वस्त, सनातन संस्था