लोणी काळभोर (पुणे) – कपडे धुण्यासाठी अल्पवयीन विद्यार्थिनीला घरी बोलावून शिक्षक सुदर्शन शेरमाळे याने वारंवार बलात्कार केला. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शिक्षकाला अटक केली आहे. पीडित तरुणी व्यवसायासंबंधी मार्गदर्शन घेण्यासाठी हांडेवाडी येथे जुलै २०२३ मध्ये केंद्रामध्ये आली होती. आरोपी हा त्या केंद्रामध्ये शिक्षक म्हणून काम करत होता. त्या ओळखीचा अपलाभ घेत आरोपीने बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाअसे वासनांध शिक्षक विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करणार ? अशा शिक्षकांना बडतर्फ करून कठोर शिक्षाच करायला हवी ! |