एका महिलेचाही समावेश
तेहरान (इराण) – इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’साठी हेरगिरी केल्याच्या प्रकरणी इराणने ४ जणांना फाशी दिली. यात ३ पुरुष आणि १ महिला यांचा समावेश आहे. हे सर्व जण इराणचे नागरिक होते. शिक्षा सुनावण्यापूर्वी या लोकांना एक आदेश वाचून दाखवण्यात आला. त्यात म्हटले होते की, तुम्ही लोकांनी ज्यूंसाठी देशाचा विश्वासघात केला आहे.
याआधीही इराणने इस्रायलसाठी हेरगिरी करणार्या अनेकांना फाशी दिली आहे. वर्ष २०२१ मध्ये एकाच गुन्ह्यासाठी ७ जणांना एकाच वेळी फाशीची शिक्षा झाली होती. इराण सरकारचे म्हणणे आहे की, देशातील काही लोक इस्रायल आणि ज्यू यांच्या हितासाठी हेरगिरी करतात आणि त्या बदल्यात त्यांना सहस्रो डॉलर्स मिळतात. अशा लोकांना कोणत्याही परिस्थितीत सोडता येणार नाही.
संपादकीय भूमिकाभारतातही देशद्रोह्यांना अशी शिक्षा मिळू लागल्यास त्यांच्यावर वचक बसू शकतोे, असेच जनतेला वाटेल ! |