नागपूर, २० डिसेंबर (वार्ता.) – अमरावती जिल्ह्यातील रिद्धीपूर येथे मराठी भाषा विद्यापिठाच्या बांधकामासाठी ५० एकर भूमी अधिग्रहीत केली जाणार आहे. याविषयी शेतकर्यांशी बोलणे चालू आहे. विद्यापिठासाठी २०० कोटी रुपये व्यय करण्यात येणार आहेत. अस्तित्वात असलेल्या बांधकामामध्ये जून २०२४ मध्ये मराठी भाषा विद्यापीठ चालू करण्यात येईल, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत दिली. चंद्रकात पाटील यांनी सभागृहात ‘महाराष्ट्र मराठी भाषा विद्यापीठ विधेयक २०२३’ सादर केले. या वेळी त्यांनी वरील माहिती दिली.