पुणे – शहराच्या पूर्व भागात चालू वर्षात ४१ अल्पवयीन मुले आणि १३४ अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत. त्यांपैकी १५८ जण सापडले असून अद्याप २८ मुले बेपत्ता आहेत. यामध्ये २७ मुलींचा समावेश आहे. त्यामुळे पुणे पोलिसांपुढे अल्पवयीन मुलांना शोधण्याचे मोठे आव्हान आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ ४ मध्ये चालू वर्षात जानेवारी ते २० ऑक्टोबरपर्यंत ७ पोलीस ठाण्यांच्या परिसरातून १७५ मुले आणि मुली बेपत्ता झाल्या आहेत. मुलांपेक्षा मुली बेपत्ता होण्याचे प्रमाण चिंताजनक आहे.
पोलीस अन्वेषणातील माहिती१. कौटुंबिक वाद आणि प्रेमात पडल्याने मुले गायब होण्याचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. पूर्व भागात विशेषतः दाट लोकसंख्या आणि झोपडपट्टी भागातील लहान मुले बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक आहे. २. अल्पवयीन मुले बेपत्ता झाल्यावर कायद्यानुसार पोलिसांना अपहरणाचा गुन्हा नोंद करावा लागतो. पोलिसांनी गुन्हा नोंद केल्यावर पोलीस अन्वेषणात आणि स्वतःहून १५८ मुले सापडली आहेत; मात्र २७ मुली आणि एक मुलगा अद्यापही बेपत्ता आहेत. ३. लोणीकंद परिसरातून सर्वाधिक ४७ मुले बेपत्ता झाली असून त्यांपैकी ३५ मुले मिळाली आहेत. अद्याप ११ मुली आणि एक मुलगा गायब आहे. त्याखालोखाल विमानतळ पोलीस ठाण्याच्या परिसरातील ६, तर चंदननगरमधून ३ मुली गायब आहेत. ४. अल्पवयीन मुले गायब झाल्यावर स्थानिक पोलिसांकडून अपहरणाचा गुन्हा नोंद करून प्राधान्याने अन्वेषण केले जाते. ६ मास अन्वेषण करूनही मुले सापडली नाहीत, तर सामाजिक सुरक्षा विभागाकडे अन्वेषण वर्ग होते. पोलिसांकडून मुलांचा शोध घेतला जातो; पण पालकांनी आपल्या पाल्यांवर लक्ष ठेवायला हवे. |
संपादकीय भूमिका :
|