‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला काही वर्षांपूर्वी दक्षिण आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत धर्मप्रचारासाठी दौरा करण्याची संधी मिळाली. त्या वेळी लक्षात आले, ‘भारतात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदुत्वासाठी कार्य करणार्या अनेक संस्था आहेत. त्यांच्याकडे प्रचंड पैसा आणि पुष्कळ कार्यकर्ते आहेत. तसेच जिल्हा, तालुका, शहर आणि गाव पातळीवरही हिंदुत्वासाठी कार्य करणार्या अनेक छोट्या-मोठ्या संघटना आहेत. एवढे सर्व असतांनाही दिवसेंदिवस बहुसंख्य असलेले हिंदू आणि हिंदु धर्म यांची अतोनात हानी होत आहे.’ खालील लेखात त्याची कारणे आणि त्यावर लक्षात आलेले उपाय यांचा ऊहापोह केला आहे.
हिंदूंवरील सर्व समस्यांचे मूळ हे ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ हे आहे ! – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपेक्षित यश न मिळण्यामागील कारण
१ अ. कोरोना महामारीवर उपाययोजना काढूनही रोगाचा संसर्ग न थांबणे : वर्ष २०२० मध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना महामारीचा संसर्ग झाला. कोरोना महामारीमुळे मृत्यू होणार्यांची संख्या पुष्कळ प्रमाणात वाढू लागली. त्या वेळी शासनानेे लोकांना घराबाहेर पडण्यास बंदी केली. सर्व व्यवहार ठप्प झाले. सगळीकडे दळणवळण बंदी होती. शासनाने मोठ्या प्रमाणावर तात्पुरती रुग्णालये उघडून लोकांवर उपचार करण्यास आरंभ केला. त्यामुळे लोक बरेही होऊ लागले; परंतु कोरोनाबाधित लोकांची संख्या पुष्कळ प्रमाणावर वाढतच होती. प्रतिदिन अक्षरशः सहस्रो लोकांचे मृत्यू होत होते.
१ आ. केवळ उपचारांपेक्षा रोग न होण्यासाठी लसीकरण केल्याने कोरोना महामारी आटोक्यात येणे : कोरोना महामारीच्या रुग्णांवर केवळ उपचार करणे, एवढेच न करता शासनाने या रोगाविषयी मोठ्या प्रमाणात प्रबोधन करण्यास आरंभ केला. तसेच ‘हा रोगच होऊ नये’, यासाठी कोरोनाविरोधी लसींची निर्मिती करून ती मोठ्या प्रमाणावर लोकांना देण्यास आरंभ केला. याचा परिणाम म्हणून हा भयंकर रोग लवकरच आटोक्यात येण्यास साहाय्य झाले.
तात्पर्य, रोग झाल्यावर उपाययोजना करण्यापेक्षा ‘रोग होऊ नये’, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करत नाही, तोवर त्या रोगावर विजय मिळवता येत नाही.
२. हिंदूंवरील समस्यांनी धारण केलेले भीषण स्वरूप !
अ. धर्मांतर : मुसलमान आणि ख्रिस्ती लोक हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत आहेत.
आ. लव्ह जिहाद : धर्मांध हिंदु धर्मातील मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे जीवन उद्ध्वस्त करत आहेत.
इ. जिहादचे अन्य प्रकार : उदाहरणार्थ लँड (भूमी) जिहाद, हलाल जिहाद (इस्लामनुसार ‘हलाल’ म्हणजे जे वैध आहे ते), थूंक जिहाद इत्यादींद्वारेही हिंदूंना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.
ई. पाश्चात्त्य शिक्षणपद्धत आणि विकृतीच्या प्रभावाखाली विसरत चाललेली चिरंतन भारतीय संस्कृती.
उ. अल्पसंख्यांकांच्या तुष्टीकरणामुळे हिंदूंवर होणारा अन्याय आणि हिंदूंकडे दुर्लक्ष करणारे राजकीय पक्ष इत्यादी.
ऊ. हिंदु धर्म, धर्मग्रंथ, देवता, संत, राष्ट्रपुरुष यांचे नाटक, सिनेमा, वृत्तपत्र, पुस्तके, दूरचित्रवाहिन्या आणि सामाजिक माध्यमे यांतून सतत अन् मोठ्या प्रमाणात होत असलेले विडंबन.
ए. हिंदु मंदिरांचे सरकारीकरण करणे आणि त्यामुळे मंदिरातील न्यून होत जाणारे चैतन्य.
ऐ. मंदिरांवर आक्रमणे करून मूर्ती भंजन करणे.
ओ. सर्वधर्मसमभावाच्या जाळ्यात अडकलेले आणि हिंदूंचे सण, उत्सव, परंपरा, साधना मार्ग इत्यादींचा अभ्यास न करता त्याला विरोध करून स्वधर्म नष्ट करायला निघालेले, अस्तनीतील निखार्याप्रमाणे वागणारे हिंदू.
अशा अनेक गंभीर समस्यांमुळे हिंदूंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
३. हिंदुत्वनिष्ठ संघटनांना अपेक्षित यश न मिळता समस्या अधिकाधिक भीषण होणे
हिंदूंवर होणार्या आघातांचा विरोध करण्यासाठी भारतातील अक्षरश: शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे लक्षावधी कार्यकर्ते मागील कित्येक दशके प्रयत्न करत आहेत. यामध्ये या संघटनांचे प्रचंड मनुष्यबळ आणि पैसा व्यय होत आहे; परंतु त्याला म्हणावे तसे यश मिळत नाही. उलट दिवसेंदिवस वरील सर्वच समस्या अधिकाधिक भीषण होत चालली आहे आणि नवनवीन संकटे उद्भवत आहेत, हे कटू सत्य आहे.
४. हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सर्व प्रयत्न वरवरचे प्रयत्न असल्यामुळे त्यांना यश न मिळणे
हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे सर्व प्रयत्न हे समस्येचे मूळ जाणून न घेता आणि त्यावर शाश्वत उपाययोजना न करता वरवर केलेले आहेत. त्यामुळे त्याला अपेक्षित यश मिळालेले नाही. या उपाययोजना, म्हणजे क्षयरोग झालेल्याला क्षयरोगाचे जंतू मारण्याचे औषध न देता केवळ खोकल्याचे औषध देण्यासारखे आहे. ‘या समस्याच निर्माण होऊ नयेत’, यासाठी प्रयत्न झाले असते, तर कोरोना विषाणूंप्रमाणे ही समस्या केव्हाच सुटली असती.
५. ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ : सर्व समस्यांचे मूळ
५ अ. धर्मशिक्षणाने हिंदूंना होणारे लाभ
१. धर्मशिक्षण घेतल्याने हिंदूंना हिंदु धर्माचे महत्त्व लक्षात येईल.
२. धर्मशिक्षणाने साधना होईल, साधनेने अनुभूती येतील आणि अनुभूतींनी श्रद्धा वाढेल, श्रद्धेने धर्माभिमान वाढेल अन् धर्माभिमानाने संघटन वाढेल.
३. संघटनाने हिंदू आणि हिंदु धर्म यांचे संरक्षण होईल अन् त्यानेच हिंदु राष्ट्राची निर्मिती अन् पोषण होईल.
४. धर्मशिक्षण घेतल्याने जागृत झालेले कृतीशील हिंदू हे हिंदु धर्मावर झालेल्या आघातांच्या विरोधात धर्मरक्षणासाठी सिद्ध होतील आणि वरील सर्व समस्या लवकरात लवकर सुटतील.
५ आ. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदू अधर्माचरणी झालेला असणे : आज हिंदूंना ‘धर्म म्हणजे काय ? हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व कोणते ? हिंदु कुणाला म्हणावे ? हिंदु धर्मात एवढ्या देवता का आहेत ? देवतांचे विडंबन होणे म्हणजे काय ?’, यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे ठाऊक नाहीत. हिंदु व्यक्ती इतर पंथियांप्रमाणे आपल्या धर्माविषयी अभिमानाने काहीच सांगू शकत नाही. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे आज हिंदू हतबल, लाचार, बलहीन आणि अधर्माचरणी झाला आहे.
५ इ. हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त होण्यासाठी हिंदूंनी धर्मशिक्षण घेणे आवश्यक ! : सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांना आघात झाल्यानंतर त्याचा विरोध करण्यात स्वतःची शक्ती व्यय करावी लागते. यासह हिंदूंच्या सर्व समस्यांचे मूळ, म्हणजेे ‘धर्मशिक्षणाचा अभाव’ असून ते दूर करण्यासाठी अधिक शक्ती व्यय केल्यास अगदी अल्पावधीत हिंदु जागृत होऊन धर्मरक्षणासाठी सिद्ध होतील, तसेच हिंदु धर्माचे पतन रोखतील, याविषयी निश्चिती बाळगावी. अशाने हिंदु धर्माला पुनर्वैभव प्राप्त होईल आणि त्यानेच हिंदु राष्ट्राची निर्मिती अन् त्याचे संवर्धन होईल.
५ ई. हिंदूंना अध्यात्माविषयीचे शिक्षण देऊन त्यांच्यात धर्माभिमान जागृत करण्यासाठी सनातन संस्था प्रयत्नशील आहे. त्यामुळे अल्प साधकसंख्येतही संस्थेकडून मोठ्या प्रमाणात धर्मजागृतीचे कार्य होत आहे.
६. कृतज्ञता
सर्व हिंदू आणि हिंदुत्वनिष्ठ यांना धर्मशिक्षणाचे महत्त्व लक्षात येऊन त्यांना ते घेण्याची बुद्धी होवो, अशी भगवान श्रीकृष्ण अन् सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी प्रार्थना आहे. सच्चिदानंद परब्रह्म गुरुमाऊलींनी सुचवलेली शब्दसुमने कृतज्ञताभावाने त्यांच्या चरणी अर्पण ! (२५.८.२०२३)
इदं न मम ।’
– (सद्गुरु) राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल.
हिंदूंनो, सनातन संस्थेच्या वतीने घेण्यात येणार्या सत्संगांचा लाभ घ्या !हिंदूंना अध्यात्मशास्त्र कळावे आणि धर्माचरणाच्या कृतींमागील शास्त्र समजावे, यांसाठी सनातन संस्थेकडून विनामूल्य साप्ताहिक सत्संग घेण्यात येतात. हे सत्संग प्रत्यक्ष वा संगणकीय प्रणाली यांद्वारे ‘ऑनलाईन’ही घेतले जातात. या सत्संगाला उपस्थित रहाण्यासाठी किंवा आपल्या भागात असे सत्संग चालू करण्यासाठी पुढे दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. संपर्क क्रमांक : ७०५८८ ८५६१० |