अ. ‘ब्राह्मतेज’ आणि ‘क्षात्रतेज’ हा ‘सनातन प्रभात’चा गाभा आहे.
आ. सध्या वृत्तपत्राच्या क्षेत्रात जेथे ‘पाकीट संस्कृती’ची (पैसे देऊन बातम्या छापण्याची) बजबजपुरी आहे, तेथे ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांपासून संपादकांपर्यंत कुणीही वेतन घेत नाही. ते निःस्वार्थी भावाने हिंदु राष्ट्राची सेवा म्हणून कार्यरत आहेत.
इ. ‘सनातन प्रभात’ हे बीजरूपात कार्य करणारे वृत्तपत्र आहे. जे विषय ‘सनातन प्रभात’ने मांडले, त्या विषयांनी पुढे आंदोलनाचे स्वरूप घेतले.
ई. धर्मद्रोह्यांच्या अशास्त्रीय आवाहनांना धर्मशास्त्र मांडून चोख प्रत्युत्तर दिले आहे. हिंदुत्वनिष्ठांच्या आंदोलनाला वैचारिक पाठबळ देण्याचे कार्य आणि ‘हिंदुत्वाचे कार्य हे साधना म्हणून कसे करावे ?’, याचे मार्गदर्शन ‘सनातन प्रभात’ करते.
उ. ‘सनातन प्रभात’चे वाचक हे केवळ ‘वाचक’ नसून रस्त्यावर उतरून कार्य करणारे हिंदुत्वनिष्ठ आहेत. त्यामुळे सर्वांगांनी ‘सनातन प्रभात’ हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ आहे.
ऊ. ‘सनातन प्रभात’ने प्रकाशित केलेल्या बातम्या आणि लेख प्रत्येक मासाला संकेतस्थळ आदी माध्यमांतून २५ लाखांपेक्षा अधिक वेळा वाचले जातात. ‘सोशल मिडिया’वरही ‘सनातन प्रभात’ लोकप्रिय आहे, हे लक्षात येते.’ (१४.८.२०२३)