पाकच्या सिंधमधील रुग्णालयात हिंदु महिलेवर डॉक्टरांकडून सामूहिक बलात्कार

पीडित हिंदू महिला

कराची (पाकिस्तान) – पाकच्या सिंध प्रांतातील एका रुग्णालयात मूत्रपिंडाच्या व्याधीवरील उपचारांसाठी आलेल्या २३ वर्षीय हिंदु महिलेला तेथील आधुनिक वैद्यांनी (डॉक्टरांनी) गुंगीचे औषध देऊन तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. यामुळे पीडित महिलेची प्रकृती खालावली. नंतर तिला जवळच्या हैदराबाद येथील रुग्णालयात भरती केले असता तेथे महिलेची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगण्यात आले. या घटनेनंतर आरोपी असलेले आधुनिक वैद्य इतर कर्मचारी पसार आहेत. या प्रकरणी पीडित हिंदु महिलेच्या नातेवाइकांनी पोलिसांत तक्रार प्रविष्ट केली आहे. ‘आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल’, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेने संतप्त झालेल्या पीडित महिलेचे कुटुंबीय म्हणाले, ‘‘अल्पसंख्यांक हिंदु समाजातील महिला पाकिस्तानातील रुग्णालयांतही सुरक्षित नाहीत. सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी.’’

संपादकीय भूमिका

भारतातील अल्पसंख्यांकांवरील कथित अत्याचारांची नोंद घेऊन भारतातील हिंदूंना तालिबानी ठरवणारा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग आता गप्प का ?