नूंह (हरियाणा) येथील हिंसाचाराचे प्रकरण
नूंह (हरियाणा) – येथे गेल्या मासात हिंदूंच्या जलाभिषेक यात्रेवर धर्मांध मुसलमानांनी केलेले आक्रमण आणि हिंसाचार यांमागे राजकुमार उपाख्य बिट्टू बजरंगी या हिंदुत्वनिष्ठाचा हात असल्याची आवई कथित धर्मनिरपेक्षतावादी अन् धर्मांध मुसलमान यांच्याकडून उठवण्यात आली होती. बिट्टू बजरंगी यांनी ३१ जुलै म्हणजे हिंसाचार झाला, त्याच्या १ दिवस आधी फेसबुकवरून भडकावणारा व्हिडिओ प्रसारित केला आणि त्यामुळे हिंसाचार झाला, असा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता.
या प्रकरणी १५ ऑगस्ट या दिवशी हरियाणा पोलिसांनी फरिदाबाद येथील बिट्टू बजरंगी यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक केली. अटकेनंतर विश्व हिंदु परिषदेने बजरंगी हे बजरंग दलाचे कार्यकर्ते नसल्याचे स्पष्ट केले आहे. परिषदेचे म्हणणे आहे की, बजरंगी यांच्या व्हिडिओतील विषय अयोग्य होता. बिट्टू बजरंगी हे ‘गोरक्षक बजरंग दला’चे संस्थापक अध्यक्ष आहेत.