काँग्रेसी नेते दिग्विजय सिंह यांची गरळओक
भोपाळ (मध्यप्रदेश) – भारतीय राज्यघटनेच्या आधारावर देश चालला पाहिजे. आज राज्यघटनेची शपथ घेऊन जे पदावर बसले आहेत, ते पंतप्रधान आणि मुख्यमंत्री (शिवराज सिंह चौहान) जर हिंदु राष्ट्राची गोष्ट करत असतील, तर त्यांनी त्यागपत्र दिले पाहिजे, अशी गरळओक काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केले.
सौजन्य न्यूज तक
अ. या वेळी बजरंग दलवर प्रतिबंध लादणार का, या पत्रकारांच्या प्रश्नावर बोलतांना सिंह म्हणाले की, बजरंग दलवर प्रतिबंध लादणार नाही; कारण त्यामध्ये काही चांगले लोकही आहेत; परंतु जे दंगली भडकावतात, अशा लोकांना सोडणार नाही !
आ. १५ ऑगस्ट या दिवशी कर्नाटकातील हुब्बळ्ळी येथे आयोजित कार्यक्रमात सिंह म्हणाले होते की, सौम्य (सॉफ्ट) आणि प्रखर (हार्ड) हिंदुत्व असा काही प्रकार होऊ शकत नाही. हिंदुत्वाची निर्मिती स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केली. हिंदुत्वाचा हिंदु अथवा सनातन धर्म यांच्याशी कोणताच संबंध नाही. (दिग्विजय सिंह यांचा जावईशोध ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|