भारतीय घटनेत सर्वधर्मसमभावाची व्‍याख्‍याच नाही ! – अधिवक्‍ता  सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

अधिवक्‍ता  सुभाष झा, सर्वोच्‍च न्‍यायालय

‘हिंदु राष्‍ट्रच का ? हिंदु राष्‍ट्र एवढ्यासाठीच की,

वर्ष १९४७ मध्‍ये धर्माच्‍या आधारावर देशाची फाळणी झाली, हे आपण सर्वजण जाणताच. मुसलमान बहुसंख्‍य होते; म्‍हणून त्‍यांना पाकिस्‍तान दिले. मग जे उरले ते काय ? जर धर्माच्‍या आधारावर फाळणी झाली आणि मुसलमानांना पाकिस्‍तान मिळाले, तर मग उरलेला हिंदुस्‍थान हिंदूंना मिळायला पाहिजे ना ? तसा तो मिळाला का ? जर मिळाला नाही, तर का मिळाला नाही ? कारण एकच आम्‍ही सर्वधर्मसमभावावर ठेवलेला विश्‍वास ! तेव्‍हापासून सर्वधर्मसमभावाचा उद़्‍घोष चालू आहे; परंतु सर्वधर्मसमभाव हे काय आहे, हे तरी आजपर्यंत कुठे कुणाला ठाऊक आहे. राज्‍य घटनेत सर्वधर्मसमभाव या शब्‍दाची व्‍याख्‍याच कुठे दिलेली नाही.’