सर्वांत धोकादायक ‘आर्थिक जिहाद’ आणि तो रोखण्यासाठीचे उपाय !

मागील लेखात आपण आर्थिक जिहादविषयी जाणून घेतले. आता त्यावरील उपायांसंदर्भात अधिक विस्ताराने समजून घेऊया. आर्थिक जिहाद हा नियोजनपूर्वक पसरवला जात आहे. त्याला संपवण्यासाठी आपल्याला पावले उचलावी लागतील.

(भाग -२)

५. आर्थिक जिहाद का आणि कसा वाढत आहे ?

आर्थिक जिहाद का आणि कसा वाढत आहे ? हे जाणून घेणे आवश्यक आहे. सौदी अरेबियासारख्या आखाती देशात सापडणारे खनिज तेल संपेल, असे अनुमान काही वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी वर्तवले होते. या कारणास्तव आखाती देशांना त्यांची अर्थव्यवस्था चालवण्यासाठी नवीन स्त्रोतांची आवश्यकता असेल. त्यातील सर्वांत महत्त्वाची गोष्ट, म्हणजे सौदी अरेबियाला हज यात्रेतून भरपूर कमाई मिळते. जगात मुसलमानांची संख्या वाढली, तर हज यात्रेतून मिळणारे उत्पन्नही वाढेल. त्यामुळे सौदी अरेबियाचे काम काहीही न करता चालू राहील. त्यामुळे भारतातील मुसलमानांना हवाला इत्यादींच्या माध्यमातून व्यवसाय उभारण्यासाठी पैसा उपलब्ध करून दिला जात आहे. त्यांना मदरसे आणि ‘मजलिस ऑफ इंडिया’ यांमध्ये व्यवसाय कसा करायचा ?, हे शिकवले जात आहे. सरकारवर दबाव आणून आणि अल्पसंख्यांकांच्या नावाखाली ते या सुविधा गोळा करतात. त्यांची मुले अधिक उत्पादन करत आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ काम करणारे हात वाढत आहेत. त्याच वेळी सरकारच्या दुटप्पी धोरणामुळे आणि डाव्या विचारसरणीच्या शिक्षणामुळे हिंदु समाज संकुचित होत आहे. त्याच वेळी अनेक धर्मांध त्यांचा विस्तार करण्यात गुंतले आहेत.

श्री. सचिन सिझारिया

६. हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंची बेरोजगारी संपवण्यासाठी पुढे यावे !

आपल्या सर्व सनातन हिंदु संघटनांनी धर्म शिकवण्यासमवेतच हिंदूंची अर्थव्यवस्था सबळ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या अनेक गरीब हिंदूंना ज्यांना धर्मात सहभागी व्हायचे आहे, त्यांना अर्थार्जनाचे प्रशिक्षण दिले पाहिजे. त्यामुळे ते आत्मनिर्भर होतील. अलीकडेच एका संस्थेने देहलीमध्ये पाकिस्तानी शरणार्थी हिंदूंना इलेक्ट्रिक दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले. त्यामुळे त्यांना काम मिळवण्यासाठी माध्यम मिळाले. त्याचप्रमाणे आपल्या संघटनांनी आवश्यक प्रशिक्षण प्रदान करण्यासाठी व्यवस्था निर्माण केली पाहिजे.

७. श्रीमंत हिंदूंनी हिंदूंना माफक दरात शिक्षण उपलब्ध करून देणे आवश्यक !

शिक्षण व्यवस्थेत डाव्या विचारसरणीचे धोरण राबवणार्‍या ख्रिस्तीधार्जिण्या लोकांचा भरणा आहे. ते हिंदु समाजाला सर्वाधिक गोंधळात टाकतात आणि बेरोजगारी निर्माण करतात. त्यामुळे मोठमोठे उद्योगपती आणि श्रीमंत वर्गातील लोक यांनी शाळा उघडून हिंदु विचारसरणी असलेल्या शिक्षकांची भरती करावी. त्यांनी हिंदूंना परवडणारे शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.

८. हिंदूंनी संघटितपणे व्यवसाय करण्याची आवश्यकता !

व्यवसायाचे प्रशिक्षण घेतल्यानंतर तो सहज चालवता येईल आणि इतर हिंदूंना जोडून तो आपल्याचकडे राहील, अशी योजना हिंदूंनी सिद्ध केली पाहिजे. झारखंडमधील काही हिंदु तरुणांनी ‘झटका मांस’ विकण्याचा व्यवसाय चालू केला. ते एका ‘हिंदु पोल्ट्री फार्म’कडून प्रतिदिन ४०-५० कोंबड्या खरेदी घेऊन त्याद्वारे ‘झटका मांस’ विकत होते. हळूहळू त्यांच्या झटका मांसाची विक्री वाढू लागली. त्यामुळे धर्मांध घाबरले. ‘हिंदु पोल्ट्री फार्म’ने झटका मांसची विक्री करणार्‍यांना कोंबड्या विकल्या, तर आम्ही त्यांच्याकडून कोंबड्या खरेदी करणे बंद करू’, अशी भूमिका घेतली. आपणही असे केले तर ?

९. अल्प व्ययात अन् लवकर शिकता येणारे उद्योग !

अ. आता हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदूंना स्वयंरोजगार निर्माण करण्यासाठी प्रेरित केले पाहिजे. जेणेकरून नोकरी मिळवण्यात त्यांचे जीवन संपून जाऊ नये. हिंदूंना त्यांच्या स्वत:च्या परिसरात सहजपणे प्रशिक्षण मिळावे आणि त्यांना आजूबाजूच्या परिसरात त्यांचा व्यवसाय करता यावा, यासाठी प्रयत्न केले पाहिजे. असे अनेक उद्योग आहेत, जे अल्प व्ययामध्ये आणि लवकर शिकून करता येतात. जसे बेकरीचे काम (टोस्ट, खारीक, पाव, बिस्किटे इत्यादी बनवणे), टायर आणि पंक्चर दुरुस्तीचे काम, इलेक्ट्रिकचे काम, वाहन दुरुस्तीचे काम (सायकल आणि दुचाकी), फेब्रिकेशनचे काम, बांधकाम, प्लंबर, इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्ती, शिलाई, जरीचे काम, नक्षीकाम, मांसविक्री, कम्युटर दुरुस्ती, न्हावी, काश्मिरी शालीसारख्या उष्ण वस्त्रांची निर्मिती आणि विक्री, मेंदी लावणे, ब्युटी पार्लर, खाद्यपदार्थ बनवणे, बिर्याणी बनवणे, आईस्क्रीम आणि कुल्फी बनवणे, सजावटी साहित्य बनवणे, पूजासाहित्य बनवणे, साबण आणि हँडवॉश बनवणे, सौंदर्य उत्पादने बनवणे, गौआधारित उत्पादने बनवणे, गूळ बनवणे, फळांचे रस, फुलांचे काम, ‘बॅण्ड बाजा’, ‘डीजे’ इत्यादी व्यवसायांविषयी छोटे अभ्यासक्रम ठेवून हिंदु समाजातील तरुणांना शिकवावे आणि त्यांना व्यवसाय उभारण्यास साहाय्य करावे. आपल्या मंदिरात उपलब्ध असलेली अतिरिक्त जागा यासाठी वापरता येईल. केरळमधील एका आश्रमामध्ये अशा प्रशिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे.

आ. कलेच्या क्षेत्रातही भरपूर रोजगार उपलब्ध होऊ शकतो. काश्मिरी हस्तकला, लाकडावरील कोरीव काम, कागदाच्या लगद्यापासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू, कापडावर छपाईचे काम, जरीचे काम, गालिचा बनवणे, हाताने भरतकाम, चित्रकला, अभिनय, गाणे आणि वाद्य वाजवणे यांचा समावेश होतो. काश्मिरी हस्तकलेचे संपूर्ण काम विशिष्ट लोकांच्या हातामध्ये आहे. त्यांची दुकाने भारतभर पहायला मिळतात. त्यांची उत्पादने पुष्कळ महाग असतात. त्यातून ते पुष्कळ पैसे कमवतात. काश्मिरी हस्तकलेप्रमाणेच वस्तू बनवून स्वस्त दरात विकूनही नफा मिळवता येतो. सहारनपूरमध्ये बहुतेक लाकडाचे कोरीव काम करणारेही इतर आहेत. तेही काम हिंदूंना शिकून करता येईल. बांगलादेशातील धर्मांधांनी भारतात हाताने केलेले भरतकाम, उदाहरणार्थ सिंधी भरतकाम, काचेवर भरतकाम, इत्यादी इंटरनेटच्या माध्यमातून शिकून अशी कामे करणे चालू केले आहे.

इ. मुंबई आणि पुणे येथील पिरसरात बिर्याणी बनवण्याचे आणि विकण्याचे काम बहुतेक त्यांच्या हातात आहे. ज्यामध्ये ते शाकाहारी आणि मांसाहारी बिर्याणी बनवून विकतात. ते उत्सवांमध्ये आणि कार्यालयांमध्येही पुरवठा करतात. याही व्यवसायामध्ये भरपूर नफा आहे. हिंदु तरुण या व्यवसायाचा अवलंब करून भरपूर नफा कमवू शकतात. हे शिकण्यासाठीही अल्प वेळ लागतो.

ई. बेकरीचे कामही विशिष्ट लोकच करतात. नानकटाई, विविध प्रकारची बिस्किटे, खारी, टोस्ट, केक आदी बेकरी उत्पादनांना पुष्कळ मागणी आहे. या व्यवसायात भरपूर नफा असून सतत रोजगार देणारा व्यवसाय आहे. हा व्यवसायही सहज शिकून चालू करता येतो. मुंबई-पुणे परिसरात पावाला पुष्कळ मागणी आहे. त्यामुळे हिंदूंनी हा व्यवसाय अवलंबला पाहिजे.

उ. मेंदी लावण्याचे काम बघायला अगदीच लहान वाटत असले, तरी अलीकडे त्याची मागणी वाढत आहे. हे काम आपल्या हिंदु भगिनी शिकून सहजपणे करू शकतात आणि चांगला नफा मिळवू शकतात. सध्या विवाह समारंभामध्ये मेंदी काढण्याच्या कामात अनेक धर्मांध तरुणांनी शिरकाव केला आहे. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’चा धोका वाढला आहे.

ऊ. बांगलादेशी मुसलमान देहली आणि गाझियाबाद भागांत बहुमजली इमारतींमध्ये छताचे काम करतात. हिंदूंनीही हे काम केले पाहिजे; कारण त्यात चांगला लाभ आहे. आपल्या धार्मिक संस्थांनीही अशी व्यवस्था चालू करावी. जेणेकरून हिंदूंना कळेल की, कोणत्या क्षेत्रात कोणता व्यवसाय करायचा ? आणि विशिष्ट व्यवसाय कसा स्थापन करायचा ?

१०. हिंदूंनी एकमेकांना साहाय्य करावे !

हिंदूंनी आपल्या धर्मबांधवांकडून साहित्य खरेदी केले पाहिजे. याचा प्रचार करण्यासाठी धार्मिक संघटनांनी सर्वाधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. हिंदूंनी त्यांच्या मेहनतीची योग्य किंमत लावली पाहिजे, म्हणजे पैशांच्या लोभापायी त्यांचा व्यवसाय बंद होणार नाही. ग्रामीण भागांतील हिंदूंना कृषी आधारित उत्पादने आणि सेंद्रिय शेती करण्याचे प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे स्थानिक हिंदूंचे पलायन थांबेल.

११. हिंदूंनी सर्वाधिक नफा असणार्‍या मांस व्यवसायाकडे दुर्लक्ष करू नये !

मांस व्यवसायाच्या माध्यमातून धर्मांध सर्वाधिक कमाई करतात. सरकारने त्यावरील कर अल्प ठेवला आहे. मांस व्यवसायात त्यांची मक्तेदारी आहे; कारण हिंदूंनी हा व्यवसाय करणे अल्प केले आहे. हल्ली हिंदूंचा मांसाहाराकडे कल वाढत आहे. शाकाहारी वर्गातही मांसाहार करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे मांसविक्री वाढू लागली आहे. हिंदूंनी हा व्यवसाय स्वीकारून नफा कमवावा. यासमवेतच त्यांनी कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन आदी व्यवसाय चालू करण्यात काहीच हरकत नाही. हे व्यवसाय अल्प भांडवलातही करता येतात.

१२. हिंदु तरुणांनी कोणत्याही कामाला न्यून लेखू नये !

हिंदु तरुणांना हे समजावून सांगणे अत्यंत आवश्यक आहे की, ते १० घंटे नोकरी करून प्रतिमास केवळ १० ते १२ सहस्र रुपये कमवू शकतात; परंतु त्यांना पंक्चर दुरुस्तींची कामे करून प्रतिदिन १ सहस्राहून अधिक रुपयेही कमावता येतात. हिंदु समाजाला नोकर्‍यांच्या मागे धावणे थांबवावे लागेल. लहान कामात पुष्कळ कष्ट करण्याऐवजी काही तरी काम शिकून स्वत:चे काम करण्यास प्रारंभ करावा. हिंदु तरुणांनी काही बनवून विकले पाहिजे किंवा दुरुस्ती करून पैसे मिळवण्याचा विचार केला पाहिजे.

१३. आर्थिक जिहादला हिंदूंचे संघटितपणे प्रत्युत्तर !

अ. काही वर्षांपूर्वी आसाममधील हिंदूबहुल आणि बौद्धबहुल भागांत येऊन धर्मांधांनी व्यवसाय करणे चालू केले. हळूहळू त्यांनी तेथील बाजारावर वर्चस्व गाजवायला प्रारंभ केला. त्यामुळे स्थानिक लोकांच्या व्यवसायाची हानी होऊ लागली. त्यानंतर काही किशोरवयीन आणि तरुण वर्गातील मुलांनी एक योजना आखली. त्यांनी हिंदु दुकानदारांना एक विशेष क्रमांक कोड लावला, तसेच याविषयी स्थानिक लोकांनाही समजावून सांगितले. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्याच दुकानातून वस्तू खरेदी करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे धर्मांधांचा व्यवसाय ठप्प झाला. त्यामुळे काही मासांतच त्यांनी ते ठिकाण सोडले.

आ. मध्यप्रदेशमधील एका गावामध्ये धर्मांधांची संख्या वाढू लागली. त्यामुळे तेथे एकदा वाद झाला. गावातील हिंदूंनी लग्नसमारंभांमध्ये निघणार्‍या मिरवणुका बँड आणि दिवे यांविना काढण्यास प्रारंभ केला. त्यानंतर तेथे कोणताही वाद झाला नाही.

आर्थिक जिहादला सामोरे जाणे अवघड नाही. आपण सजग आणि सतर्क असायला हवे. रणनीती बनवून काम करणे आपल्यासाठी पुष्कळ महत्त्वाचे आहे. हिंदूंना पुन्हा धडाडीने आणि परस्पर सामंजस्याने त्यांचे व्यवसाय चालू  करावे लागतील, तरच ते या संकटावर मात करू शकतील.’

(समाप्त)

– श्री. सचिन सिझारिया, पुणे. (१४.७.२०२३)