‘लव्ह जिहाद’चे जागतिक षड्यंत्र रोखा !

वैश्‍विक हिंदु राष्ट्र महोत्सवामध्ये ‘लव्ह जिहाद’विषयी करण्यात आलेले उद्बोधन

‘द केरल स्टोरी’ या चित्रपटाने भारतातील ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आणि त्याचा ‘इसिस’ या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित निधर्मीवाद्यांकडून या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला, कुठे बंदी घालण्यात आली, तर कुठे चित्रपटांनी तो दाखवण्यास नकार दिला. भारताच्या मुलींना कुणी तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचा धर्म, आई-वडील, संस्कृती, अस्तित्व सर्वकाही हिरावून घेऊन, त्यांनाच स्वतःच्या देशाच्या-धर्माच्या-कुटुंबाच्या विरोधात ‘जिहाद’ करण्यासाठी सिद्ध केले जाते, ही सामान्य गोष्ट नव्हे ! मात्र मुसलमान व्होट बँक (मतपेढी) टिकवून ठेवण्यासाठी चित्रपटाला विरोध करण्यात आला. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, जे निधर्मीवादी हा चित्रपट स्वीकारायला सिद्ध नाहीत, ते प्रत्यक्षातील लव्ह जिहादची भयानकता कसे स्वीकारतील ? ते हिंदु मुलींच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील का ? याचाच परिणाम म्हणून देशभरात लव्ह जिहादच्या घटनांनी थैमान घातले आहे. देहलीतील साक्षी दीक्षितची क्रूर हत्या असो वा मुंबईच्या श्रद्धा वालकरचे तुकडे तुकडे करणे असो, या जिहादींना कोणतीही भीतीच राहिलेली नाही, असे दिसते.

एखादा फासेपारधी जसे दाणे टाकून निष्पाप पक्ष्यांना जाळ्यात अडकवतो, तसेच मैत्री करण्यासाठी मुसलमान मुलींचा वापर करून, स्वतः हिंदु असल्याचे भासवण्यासाठी खोटी ओळख सांगून, हाताला लाल धागा बांधून, भेटवस्तू देऊन हिंदु मुलींना या जाळ्यात ओढले जाते. इतिहासाच्या अज्ञानामुळे हिंदु मुलींना त्यांच्याकडून काही छळ-कपट होण्याची, भविष्यातील संकटाची जाणीवच नसते. पुढे हिंदु युवतीला जिहादचे पहिले पाऊल म्हणून इस्लाम स्वीकारण्याची बळजोरी केली जाते. त्यासोबत तिला बुरखा घालणे, गायीचे मांस खाणे, तलाक पद्धती (घटस्फोट), यांंचा स्वीकार करावा लागतो आणि पुढे तिचे जीवन नरकयातनांचे बनून जाते.

‘द केरल स्टोरी’सारखा चित्रपट असो किंवा साक्षी, श्रद्धा यांच्या निर्घृण हत्या असोत, त्यांचा काही काळापुरताच हिंदु समाजावर परिणाम टिकतो; मात्र हिंदु मुलींना या संकटातून वाचवण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना केली जात नाही. तसे झाले असते, तर श्रद्धा वालकरचे फ्रीजमध्ये तुकडे सापडल्यावर साक्षी, अंकिता सिंह, मानसी दीक्षित, तनिष्का शर्मा, खुशी परिहार, वर्षा चौहान, हिना तलरेजा आदी हिंदु तरुणींची अशाच प्रकारची क्रूर हत्या झाली नसती.

श्री. आनंद जाखोटिया

१. हिंदु भगिनी ‘लव्ह जिहाद’मध्ये फसण्याचे कारण

१ अ. लव्ह जिहादसाठी मुसलमान युवकांना प्रशिक्षित करून त्यांचा वापर करणे : संपूर्ण जगाला ‘दार-उल्-इस्लाम’ बनवणे, म्हणजेच जगावर इस्लामी सत्ता राखणे, हे मुसलमानांचे स्वप्न आहे ! सरकारने बंदी घातलेल्या ‘पी.एफ्.आय.’चे (‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’चे) ‘व्हिजन-२०४७ डॉक्युमेंट’ (वर्ष २०४७ पर्यंत भारताला इस्लामी देश बनवण्यासाठीचे षड्यंत्र) याचाच भाग आहे. त्यासाठी जिहादच्या कोणत्याही मर्यादेपर्यंत जाण्याची त्यांची सिद्धता आहे. या जिहादच्या कार्यात प्राण गेल्यास त्यांच्यासाठी ‘जन्नत’मध्ये (स्वर्गात) उपभोगासाठी ७२ हुरे (सुंदरी) मिळण्याचे स्वप्न मौलवींकडून त्यांना दाखवले जाते. त्यात शरिरावर बाँब बांधून घेण्यापेक्षा ‘लव्ह जिहाद’ ही सर्वांत सोपी पद्धत असल्याने तिचा सर्वाधिक वापर केला जातो. त्यासाठी ते दिसायला चांगल्या, सुशिक्षित युवकांना प्रशिक्षित करून त्यांचा वापर करतात. हिंदु मुलगी जाळ्यात फसली की, तिला ते खरे स्वरूप दाखवून तिच्यावर इस्लाम स्वीकारण्याची सक्ती करतात. तिला इस्लामी वेशभूषा, रहाणीमान, हे सर्व स्वीकारायला लावतात. हे सर्व झाल्यावर ते पुन्हा पुढच्या मुलीला जाळ्यात अडकवण्यासाठी कार्यरत होतात. श्रद्धा वालकरचे तुकडे करणार्‍या आफताब पूनावालाने अशाच प्रकारे २० हिंदु मुलींना स्वतःच्या जाळ्यात अडकवले होते.

१ आ. हिंदूंवरील निधर्मीवादाचा प्रभाव आणि ‘माझा अब्दुल तसा नाही’ अशी मानसिकता ! : लव्ह जिहादमध्ये प्रेमाच्या सहज सुलभ भावनांचा वापर केला जातो. यासाठी युवावस्थेत निर्माण होणार्‍या भावनांचा तथा शारीरिक आकर्षणाचा उपयोग केला जातो. त्यात हिंदु मुलींविषयी ते सोपे ठरते; कारण त्यांचे आई-वडील आधीच सर्वधर्मसमभाव मानणारे झालेले आहेत. हिंदु पद्धतीने धर्माचरण करणे बुरसटलेल्या विचारांचे समजले जात आहे. विदेशी परंपरांचे गुलाम झाल्यासारखे हिंदूंचे वागणे चालू आहे. वाढदिवसाला केक कापणे, दर्ग्यावर जाणे, रमजान पाळणे आदी हिंदूंना प्रगतीशील बनल्याची लक्षणे वाटतात. इस्लामच्या खर्‍या इतिहासापासून हिंदू अनभिज्ञ आहेत. लव्ह जिहादमध्ये फसलेल्या हिंदु भगिनींना सावधान केल्यावर त्यांचे म्हणणे असते की, ‘इतर मुसलमान वाईट असतील, मात्र माझा प्रेमी अब्दुल तसा नाही, तो वेगळा आहे’; परंतु त्यानंतर काही मासांतच सगळे अब्दुल एकाच विचारसरणीचे असल्याचे कळते आणि मग कोणताही उपाय रहात नाही. त्यानंतर त्यांना जीवनभर पश्‍चात्ताप करण्याविना कोणताही पर्याय उरत नाही.

२. लव्ह जिहाद करण्यासाठी मुसलमानांकडून केल्या जाणार्‍या युक्त्या 

अ. लव्ह जिहादमध्ये हिंदु मुलीशी जवळीक करण्यासाठी माध्यम म्हणून मुसलमान तरुणींचा वापर केला जातो. त्या हिंदु मुलींना मुसलमान मुलांशी परिचय करून देण्याचे कार्य करतात.

आ. मोबाईल रिचार्ज सेंटर, शिकवणीवर्ग यांच्या माध्यमातून हिंदु तरुणींचे भ्रमणभाष क्रमांक मुसलमान तरुणांना दिले जातात तथा त्यांच्याशी मैत्री वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात.

इ. आधुनिक जिम (व्यायाम) प्रशिक्षक बनून हिंदु मुलींशी जवळीक करून त्यांना फसवले जाते.

ई. स्वतःला उच्चवर्णीय हिंदू असल्याचे दाखवून हिंदु मुलींशी जवळीक केली जाते. त्यानंतर हिंदु धर्मात अनेक देव आहेत; मात्र ते काही उपयोगाचे नाहीत, असे विचार मांडून त्यांचा बुद्धीभेद करून त्यांना धर्मांतरास तयार केले जाते.

उ. महागड्या गाड्यांचा वापर करून मुलींवर प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, तसेच त्यांना महागड्या भेटवस्तू देऊनही जवळीक केली जाते.

ऊ. कार्यालयात काम करण्यास साहाय्य, तसेच नम्र, प्रेमळ राहून मुलींना आवश्यक मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला जातो.

ए. सिनेमातील नट-नट्यांचे महागडे छंद, फॅशन, ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ (विवाह न करता तरुण-तरुणींनी एकत्र रहाणे) यांच्या प्रभावाचा लाभ हे लव्ह जिहादवाले उठवतात. ‘लिव्ह इन रिलेशनशिप’च्या शारीरिक संबंधांच्या संकल्पनेत विवाहाचे कोणतेही संस्कार आणि बंधने नसतात, हे हिंदु मुलींना समजत नाही आणि त्या लव्ह जिहादमध्ये फसतात.

३. जगभरातील लव्ह जिहादचे संकट

लव्ह जिहादचे संकट भारतापुरते मर्यादित नसून जगभरात ते चालू आहे. २९ सप्टेंबर २००९ ला लंडनचे पोलीस आयुक्त सर इयान ब्लेअर यांनी सर्वप्रथम तेथील कुटुंबांना सतर्क केले होते, ‘मुसलमान समाजातील युवक षड्यंत्रपूर्वक हिंदु, शीख आणि ख्रिस्ती युवतींना त्यांच्या प्रेमजालात फसवण्याचे काम करत आहेत.’ त्या कालावधीत लव्ह जिहादला ‘रोमिओ जिहाद’ म्हटले जायचे. आजही जगभरात अनेक देशांत ‘ग्रुमींग गँग’च्या (लव्ह जिहादसाठी कार्यरत धर्मांधांची टोळी) नावे अशाच प्रकारे स्थानिक युवतींना इस्लामच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर केले जात आहे.

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. आनंद जाखोटिया, मध्यप्रदेश आणि राजस्थान समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.