श्रीलंकेने भारतीय रुपयाला दिला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा !

श्रीलंकेत वापरता येणार रुपया !

नवी देहली – श्रीलंकेचे राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे २ दिवसांच्या भारत भेटीवर आहेत. त्यांनी भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलनाचा दर्जा दिल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी दिली.

बागची म्हणाले की, भारतीय चलनात व्यवहार करण्यासाठी श्रीलंकेने त्याच्या प्रणालीमध्ये भारतीय रुपयाचा ‘नियुक्त परकीय चलन’ (विशेष परकीय चलन) म्हणून समावेश केला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर रुपयाचे वजन वाढणार आहे.