लैंगिक समस्यांवरील औषधांवर अमेरिकी सैन्य प्रतिवर्षी करते ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च !

सैनिकांना येणार्‍या मानसिक ताणामुळे निर्माण होतात लैंगिक समस्या !

एवढ्या पैशांत कितीतरी पूल उभारले जाऊ शकतात ! – संतप्त अमेरिकी खासदार

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकी सैन्य सैनिकांना भेडसावणार्‍या लैंगिक समस्यांवर उपाय मिळण्यासाठी प्रतिवर्ष ३४१ कोटी रुपयांहून अधिकचा खर्च करते. डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार समर ली यांनी एका सैन्याधिकार्‍याला विचारलेल्या प्रश्‍नावर त्यांनी ही माहिती दिली. यावर संतप्त झालेल्या पेन्सिलव्हेनियाचे खासदार ली म्हणाले की, एवढ्या पैशांत तर अमेरिकेतील अनेक पूल उभारले जाऊ शकतात.

अमेरिकी सैन्य अनेक देशांमध्ये तणावाच्या परिस्थितीत दिवस काढते. त्यामुळे एका अनुमानानुसार किमान २० टक्के सैनिकांना मानसिक ताणासह लैंगिक समस्याही भेडसावतात. त्यांच्यावर उपाय म्हणून सैन्याकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी केली जातात.