छत्रपती संभाजीनगर येथे धर्माधांनी केलेल्‍या दगडफेकीत हिंदूंच्‍या ४ वाहनांची हानी !

हिंदूंनो, रात्र नव्‍हे, तर प्रत्‍येक क्षण वैर्‍याचा आहे, हे लक्षात ठेवा !

घटनास्थळी दाखल झालेले पोलीस
हिंदूंच्‍या घरावरही धर्मांधांची दगडफेक ! १५ जणांविरोधात गुन्‍हा नोंद !

छत्रपती संभाजीनगर – शहरातील अंगुरीबाग परिसरात २३ जूनच्‍या मध्‍यरात्री अंगणात विजय काथार हा तरुण उभा होता. त्‍या वेळी सय्‍यद इरफान याच्‍या दुचाकीचा धक्‍का त्‍याला लागला. यातून या दोघांमध्‍ये झालेल्‍या वादावादीत धर्मांधांनी विजय यांच्‍या कुटुंबियांतील सदस्‍यांना मारहाण केली, तसेच घरावर दगडफेक करत ३ दुचाकींसह एका चारचाकी वाहनाची तोडफोड केली. (धर्मांध धडधडीत हिंदूंना मारहाण करून वाहनांची हानी करत असतांनाही पोलीस हे प्रकरण गांभीर्याने का घेत नाहीत ? धर्मांधांवर नुसते गुन्‍हे नोंद करण्‍याऐवजी पोलिसांनी या धर्मांधांचे कटकारस्‍थान आणि दंगल घडवण्‍याचे पूर्वनियोजित षड्‌यंत्र ओळखून त्‍यानुसार कारवाई केली पाहिजे, तरच धर्मांधांकडून कुणावरही अत्‍याचार होणार नाहीत. – संपादक) या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्‍यात १५ जणांवर गुन्‍हा नोंद करून २४ जून या दिवशी ६ जणांना अटक करण्‍यात आली आहे.

विजय काथार हा अंगणात उभा होता. त्‍यास सय्‍यद इरफान याच्‍या दुचाकीचा धक्‍का लागल्‍यानंतर दोघांमध्‍ये वाद होऊन भांडण चालू झाले. काही वेळातच जमाव जमला. हे भांडण सोडवण्‍यासाठी आलेला मयूर परदेशी, विजयच्‍या वहिनी हर्षाली काथार, भाऊजी सुधाकर काथार, सुनीता काथार, योगिता काथार यांनाही जमावाने शिवीगाळ करत जिवे मारण्‍याची धमकी दिली. त्‍यानंतर आक्रमणकर्त्‍यांनी काथार यांच्‍यासह परिसरातील रहिवाशांच्‍या घरासमोर उभ्‍या ३ दुचाकींसह एका कारची तोडफोड केली.

घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्‍याचे पोलीस निरीक्षक संतोष पाटील फौजफाट्यासह घटनास्‍थळी आले. पोलिसांना बघून धर्मांधांच्‍या गटातील टोळक्‍यांनी पळ काढला. पोलीस वेळेत आले नसते, तर मुसलमान गटाकडून मोठ्या प्रमाणावर तोडफोड झाली असती, असे प्रत्‍यक्षदर्शींनी सांगितले. या प्रकरणी मयूर परदेशी याच्‍या तक्रारीवरून क्रांती चौक पोलीस ठाण्‍यात १५ जणांविरुद्ध गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. आरोपी सय्‍यद इरफानसह इम्रान, सलमान, मुजीब, नदीम, बल्लू, मुजफर, गुड्डू, अमजद, दानिश, बाखेर, अजीम, मद्दसीर, अमान, अदनान अशी गुन्‍हा नोंद केलेल्‍या धर्मांधांची नावे आहेत.

सय्‍यद इरफान याच्‍या तक्रारीवरून चौघांविरोधात अदखलपात्र गुन्‍हा नोंद करण्‍यात आला आहे. पोलिसांनी ६ आरोपींना २४ जून या दिवशी अटक केली. न्‍यायालयाने त्‍यांना ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. परिसरात दंगा नियंत्रण पथक तैनात करण्‍यात आले. पोलीस आयुक्‍त मनोज लोहिया आणि उपायुक्‍त दीपक गिर्‍हे यांनी घटनास्‍थळी भेट देऊन दीड घंटा परिसराची पाहणी करत पोलिसांना सूचना दिल्‍या. दुसर्‍या दिवशीही परिसरात तणावाचे वातावरण होते. पोलिसांनी कडक बंदोबस्‍त ठेवला आहे.

संपादकीय भूमिका :

  • हिंदूंचे रक्षणकर्ते वाली कुणी नसून आता हिंदूंनाच त्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी सिद्ध व्‍हावे लागणार आहे, असेच त्‍यांना वाटते !
  • दिवसेंदिवस धर्मांधांकडून किरकोळ कारणावरून हिंदूंना मारहाण करणे, त्‍यांच्‍या मालमत्तेची हानी करण्‍याच्‍या प्रकारात प्रचंड वाढ होत आहे. असे असतांनाही पोलिसांकडून धर्मांधांवर कठोर कारवाई होण्‍याऐवजी वरवरची कारवाई केली जात आहे. त्‍यामुळे आणखी गुन्‍हे करण्‍यास धर्मांधांचे फावत आहे. यासाठी पोलिसांनी धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, अन्‍यथा हिंदूंना कायदा हातात घेतल्‍यास त्‍याला पोलीसच उत्तरदायी असतील, हे पोलिसांनी लक्षात ठेवावे.