हिंदु युवतींना गौरवशाली सांस्कृतिक इतिहास सांगितल्यास ‘लव्ह जिहाद’ला विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल ! – आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

रामनाथी, २१ जून (वार्ता.) – ‘द केरला स्टोरी’ या सिनेमाने भारतातील ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र आणि त्याचा ‘इस्लामिक स्टेट’च्या जागतिक आतंकवादाशी संबंध सिद्ध करून दाखवला; मात्र तथाकथित सेक्युलरवाद्यांकडून या सिनेमाला अनेक ठिकाणी विरोध करण्यात आला, कुठे बंदी घालण्यात आली, तर कुठे सिनेमागृहांनी दाखवण्यास नकार देण्यात आला.

भारताच्या मुलींना कोणी तरी प्रेमाच्या जाळ्यात अडकवून, त्यांचा धर्म, आई-वडील, संस्कृती, अस्तित्व सर्वकाही हिरावून घेऊन, त्यांनाच स्वतःच्या देशाच्या-धर्माच्या-कुटुंबाच्या विरोधात ‘जिहाद’ करण्यासाठी सिद्ध केले जाते, ही सामान्य गोष्ट नव्हे ! मात्र मुसलमान मतपेढी टिकवून ठेवण्यासाठी सिनेमाला विरोध करण्यात आला. येथे आपण लक्षात घेतले पाहिजे की, जे सेक्युलरवादी हा सिनेमा स्वीकारायला सिद्ध नाहीत, ते प्रत्यक्षातील लव्ह जिहादची भयानकता कशी स्वीकारतील ? ते हिंदु मुलींच्या रक्षणासाठी प्रयत्न करतील का ? याचाच परिणाम म्हणून देशभरात लव्ह जिहादच्या घटनांनी थैमान घातले आहे.

हिंदु जनजागृती समिती पुरस्कृत ‘लव्ह जिहाद’ ग्रंथ

हे संकट थांबवण्यासाठी आपल्या मुलींना छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप यांचे जीवन, तसेच छत्रपती संभाजी महाराज, राणी लक्ष्मीबाई, राणी पद्मावती यांनी धर्मासाठी केलेला गौरवपूर्ण त्याग सांगावा लागेल. हिंदु युवतींपर्यंत पराक्रमाचा इतिहास पोहाचवला, तर लव्ह जिहादचा केवळ विरोधच नाही, तर प्रतिकारही होईल.

आनंद जाखोटिया, राज्य समन्वयक, मध्यप्रदेश आणि राजस्थान, हिंदु जनजागृती समिती

यासमवेतच हिंदु युवतींमध्ये लव्ह जिहादच्या संदर्भात जागृती करणे, त्यांना हिंदु धर्मशास्त्रांच्या संदर्भात शिक्षण देणे, विविध समाजघटकांमध्ये जाऊन प्रबोधन आणि संघटन करणे, त्यांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे, ज्या हिंदु मुलींना पुन्हा हिंदु धर्मात प्रवेश घ्यायचा आहे, त्यांच्यासाठी घरवापसीची योजना आखणे, लव्ह जिहादच्या विरोधात बनवलेले कायदे कठोर करण्यासाठीचे प्रयत्न करणे आणि आंदोलन करणे अशा विविध उपाययोजना कराव्या लागतील, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे मध्यप्रदेश आणि राजस्थान राज्य समन्वयक श्री. आनंद जाखोटिया यांनी काढले. ते वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवाच्या सहाव्या दिवशी (२१.६.२०२३ या दिवशी) उपस्थितांना संबोधित करत होते.