साधकांना सूचना आणि वाचकांना विनंती !

‘सनातनच्या साधकांवर असणारी ईश्वराची कृपा आणि त्यांची साधनेची तळमळ यांमुळे आपल्या पिढीला ‘दैवी कण’ बघण्यास मिळत आहेत. असे दैवी कण काही साधकांच्या त्वचेवरही आढळून येतात. काही वेळा हे त्वचेवर असतात, तर काही वेळा हे त्वचेच्या रंध्रांमध्ये असतात. अशा प्रकारे दैवी कण आलेले असल्याचे कुणाला लक्षात आल्यास, त्याचे छायाचित्र काढून ते पुढील माहितीसह पाठवावे.

१. छायाचित्र कुणाचे ?

२. छायाचित्र काढल्याचा दिनांक

३. शरिराच्या कोणत्या अवयवावर हे दैवी कण दिसत आहेत ?

४. दैवी कणांची संख्या

५. ते किती घंटे/ दिवस दिसत होते ?

६. संबंधितांची आध्यात्मिक पातळी घोषित केलेली असल्यास तिचा उल्लेख करावा.

७. दैवी कणांमध्ये वैशिष्ट्यपूर्ण काही लक्षात आल्यास, उदा. रंग, तर त्याचाही उल्लेख करावा.

८. त्यासंदर्भात अनुभूती आली असल्यास तिचा उल्लेख करावा.

छायाचित्र काढतांना लक्षात घ्यायची सूत्रे

१. दैवी कण दिसतील, अशा प्रकारे त्यांचे जवळून छायाचित्र काढावे.

२. दैवी कण दिसणार्‍या अवयवाचेही छायाचित्र काढावे.

३. दैवी कणांची अस्पष्ट छायाचित्रे पाठवू नये.

ही छायाचित्रे आणि सविस्तर माहिती [email protected] या इ-मेल पत्त्यावर पाठवावीत.

दैवी कण :  सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.