जिल्हा प्रशासन अन्वेषण करण्यास साहाय्य करत नाही ! – राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाचा आरोप
डूंगरपूर (राजस्थान) – येथील एका सरकारी शाळेतील किमान ६ विद्यार्थिनींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली शाळेच्या प्राचार्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी अन्वेषण करणार्या राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या गटाला स्थानीय जिल्हा प्रशासनाचे साहाय्य मिळत नसल्याची तक्रार आयोगाचे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी केली आहे. ३१ मे या दिवशी ग्रामस्थांनी प्राचार्याच्या विरोधात तक्रार केल्यानंतर हे प्रकरण समोर आले. ३ जून या दिवशी प्राचार्याला अटक करण्यात आली.
राजस्थान के सरकारी स्कूल में रेप, पोर्न देख छात्राओं का शोषण करता था हेडमास्टर: NCPCR ने बताया- जाँच में मदद नहीं कर रहा डूंगरपुर प्रशासन#Rajasthan #NCPCRhttps://t.co/ro61bDX7A3
— ऑपइंडिया (@OpIndia_in) June 9, 2023
१. आरोपी प्राचार्याचे नाव रमेशचंद्र कटारा असून तो ८ ते १२ वर्षे वयाच्या विद्यार्थिनींना सुट्टीच्या काळात बोलावून त्यांना अश्लील चित्रफिती दाखवत असे. त्यानंतर त्यांच्यावर बलात्कार करत असल्याची माहिती स्थानीय प्रसारमाध्यमांनी दिली आहे.
२. पीडितांनी याची माहिती त्यांच्या पालकांना देऊ नये, यासाठी तो त्यांना धमकावत असे. ‘तुम्हाला अनुत्तीर्ण करीन’ अथवा ‘जवळच्या तलावात तुम्हाला ढकलून मारीन’, अशा प्रकारे तो त्यांना घाबरवत असे.
३. एका पीडितेच्या पोटात वारंवार दुखू लागले. तिला तिच्या आईने याविषयी सातत्याने विचारणा केल्यावर हे सर्व प्रकरण समोर आले.
४. अन्य एका पीडितेच्या आईने सांगितले की, प्राचार्याने ६ नाही, तर १० विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण केले आहे. पोलिसांनीही यास दुजोरा दिला असून पुढील अन्वेषण करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिका
|