उत्तराखंडमध्ये हिंदु महिलेची हत्या करणार्‍या नूर हसन याला अटक

पोलिसांसमवेत आरोपी नूर हसन

उधमसिंह नगर (उत्तराखंड) – येथील कनौरा गावात नूर हसन या तरुणाने ब्लेडद्वारे हिंदु महिलेचा गळा कापून हत्या केली. या महिलेचा मृतदेह येथील ऊसाच्या शेतात नग्नावस्थेत सापडला. मृत महिला नूर हसन याच्याकडे गेल्या ८ वर्षांपासून काम करत होती. त्यांच्यात शारीरिक संबंध होते. काही कारणांनी त्यांच्यात वाद झाल्यावर नूर याने तिची हत्या केली. पोलिसांनी नूर हसन याला अटक केली आहे.

संपादकीय भूमिका

अशांना शरीयतनुसार कमरेपर्यंत भूमीमध्ये गाडून त्यांच्यावर दगड मारण्याची शिक्षा करण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !