‘या सोहळ्याचा लाभ मिळणार असल्याचे समजल्यावर काय जाणवले ? प्रत्यक्ष सोहळा पहातांना काय जाणवले ? आणि सोहळा साजरा झाल्यावर काय जाणवले ?’, याविषयीच्या अनुभूती पाठवा !

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव’ पहाण्याची संधी मिळालेल्या साधकांना सूचना !

सप्तर्षींच्या आज्ञेने रथात विराजमान श्रीविष्णुरूपातील परात्पर गुरु डॉ. आठवले, त्यांच्या आध्यात्मिक उत्तराधिकारी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (डावीकडे) आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ (उजवीकडे)

रथारूढ भगवान श्रीविष्णूची नृत्य, गायन आणि वादन यांद्वारे स्तुती करणे, म्हणजे ब्रह्मोत्सव ! साधकांना भावभक्तीत डुंबवणारा विष्णुस्वरूप सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव फर्मागुडी (गोवा) येथे साजरा करण्यात आला.

भव्य स्वरूपात साजर्‍या झालेल्या या सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा इत्यादी राज्यांतील १० सहस्रांहून अधिक साधक उपस्थित होते, तसेच सर्वत्रच्या अन्य सहस्रो साधकांना या सोहळ्यात ‘ऑनलाईन’ सहभागी होण्याची संधी मिळाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे दर्शन झाल्याने सहस्रो साधकांना कृतकृत्य झाल्यासारखे वाटले.

या सोहळ्याच्या माध्यमातून गुरूंनी साधकांवर केलेल्या कृपेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी सर्व साधकांना पुन्हा एकदा मिळाली आहे. ‘या सोहळ्याचा प्रत्यक्ष किंवा ‘ऑनलाईन’ सहभागी होण्याविषयी समजल्यावर काय जाणवले ? सोहळा पहातांना काय जाणवले ? आणि सोहळा साजरा झाल्यावर काय जाणवले ?’, याविषयीच्या अनुभूती साधकांनी [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवाव्यात अन् त्या माध्यमातून गुरूंच्या चरणी अनुभूतीरूपी कृतज्ञतापुष्प अर्पण करावे.