पीडित हिंदूंना भेटण्यास गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या समितीला पोलिसांनी रोखले !

बंगालमध्ये श्रीरामनवमीला धर्मांध मुसलमानांनी केलेल्या दंगलीचे प्रकरण

फॅक्ट फाइंडिंग टीमच्या सदस्या भावना बजाज

कोलकाता (बंगाल) – बंगालच्या हुगळीमध्ये श्रीरामनवमीच्या वेळी झालेल्या हिंसाचाराविषयी माहिती घेण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय मानवाधिकाराच्या ‘फैक्ट फाइंडिंग कमेटी’ला पोलिसांनी पीडित हिंदूंची भेट घेऊ दिली नाही. याविषयी कमेटीने म्हटले की, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार काय लपवू पहात आहे ? पीडितांना एकट्याने भेटण्यावरही जमावबंदी लागू करून विरोध केला जात आहे.

कमेटीच्या सदस्या भावना बजाज यांनी सांगितले की, आम्ही पीडितांना भेटण्यासाठी गेलो असता पोलिसांनी आम्हाला थांबवले. आम्ही केवळ पीडितांना भेटू इच्छित होतो; परंतु आम्हाला त्यांच्यापर्यंत पोचू दिले नाही. ‘राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यास सक्षम नाही का ?’, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थत केला.

संपादकीय भूमिका

बंगालमधील तृणमूल काँग्रेसचे हिंदुद्रोही आणि कायदाद्रोही सरकार ! आतातरी केंद्रशासनाने बंगालमधील हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लावणे आवश्यक !