अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतीची हानी ! – उपमुख्‍यमंत्री

मुंबई, ८ मार्च (वार्ता.) – अवकाळी पावसामुळे ८ जिल्‍ह्यांतील १३ सहस्र ७२९ हेक्‍टर शेतपिकांची हानी झाल्‍याची माहिती उपमुख्‍यमंत्री फडणवीस यांनी ८ मार्च या दिवशी विधानसभेत दिली. नाशिक, धुळे, नंदुरबार, वाशिम, जळगाव, नगर, पालघर आदी जिल्‍ह्यांतील पिकांची हानी झाली आहे. गहू, मका, पपई, द्राक्षे आदी फळ-पिके यांची हानी झाली, तसेच भाजीपाल्‍याचीही हानी झाली, अशी माहिती फडणवीस यांनी विधानसभेत दिली.