बांग्लादेशात तस्करी करून ब्लेड बनवले जात असल्याने ५ रुपयांचे जुने नाणे करण्यात आले बंद !

नवी देहली – रिझर्व्ह बँकेने ५ रुपयांचे जुने नाणे बंद केले आहे. त्याऐवजी नवीन नाणे प्रसारित केले आहे. यामागील कारण धक्कादायक असल्याचे समोर आले आहे. ५ रुपयांचे जुने नाणे वजनाने अधिक होते. त्यात धातूचे प्रमाणे अधिक असल्याने बांगलादेशात त्याची तस्करी करून ती वितळवण्यात येत होती. ही नाणी वितळवून त्याचे दाढी करण्याचे ब्लेड बनवण्यात येत होते.

एका नाण्यापासून ७ ब्लेड बनवून ते १२ रुपयांना विकण्यात येत होते. ५ रुपयांच्या बदल्यात ७ रुपयांची कमाई केली जात होती. ही माहिती मिळाल्यानंतर रिझर्व्ह बँकेने ५ रुपयांची जुनी नाणी बंद करून नवीन नाणी आणली. त्याचा धातू पालटण्यात आला असून पातळही करण्यात आले आहे.