बारामती (पुणे) येथील मुरुम उत्खननाच्या प्रकरणी ठेकेदाराला ४ कोटी रुपयांचा दंड !

बारामती (जिल्हा पुणे) – संत तुकाराम महाराज पालखी महामार्गावर अवैध उत्खनन केल्याप्रकरणी ठेकेदार ‘शेळके कन्स्ट्रक्शन प्रा.लि.’ यांना बारामतीच्या तहसिलदारांनी ४ कोटी ११ लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते मंगलदास निकाळजे यांनी पाठपुरावा केला होता. उंडवडी सुपे येथे मुरुमाचे अवैध उत्खनन केल्याची गोष्ट स्पष्ट झाल्यानंतर बारामतीचे तहसिलदार विजय पाटील यांनी शेळके कन्स्ट्रक्शन प्रा.लि. यांच्या वतीने महेश सरदार यांना ७ दिवसांत हा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. उंडवडी सुपे येथील भूमीतील मुरुमाची कोणतीही अनुमती न घेता उत्खनन केल्याची तक्रार या प्रकरणी प्रविष्ट झाली होती.