मी हिंदुत्‍वनिष्‍ठ आणि ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ आहे !

फ्रान्‍सुआ गोतिए

१. हिंदु हे जगातील सर्वांत छळ झालेले, सहनशील आणि सर्वसमावेशक !

माझे नाव फ्रान्‍सुआ गोतिए असून मी फ्रेंच आहे. मी कॅथॉलिक म्‍हणून जन्‍मलो आणि वाढलो असलो, तरी मी एक हिंदुत्‍वाचा समर्थक आहे. हिंदू हे जगात सर्वाधिक छळ झालेले आणि सहनशील लोकांपैकी एक आहेत. मी एक लेखक आणि पत्रकार म्‍हणून हिंदूंचे रक्षण करण्‍याचा प्रयत्न करतो; कारण हिंदु धर्माच्‍या मागे एक सर्वकालिक अध्‍यात्‍म आहे की, जे वैश्‍विक आहे. ‘हिंदू ‘वसुधैव कुटुम्‍बकम्’ मानतात, म्‍हणजे हे जग एक कुटुंब आहे’, असे ते समजतात. या पृथ्‍वीवरील २ सर्वांत मोठे एकेश्‍वरवादी धर्म अजूनही विश्‍वास ठेवतात की, ‘केवळ त्‍यांचाच एकमेव देव खरा आहे आणि संपूर्ण मानवतेला या खर्‍या देवामध्‍ये रूपांतरित करणे, हे त्‍यांचे कर्तव्‍य आहे’, असे समजून मग ते बलपूर्वक किंवा आर्थिक प्रलोभनाने प्रयत्न करत असतात.

२. जगभरात हिंदूंची नकारात्‍मक प्रतिमा निर्माण करण्‍याचा केला जाणारा प्रयत्न !

हिंदु धर्माचा प्राचीन काळापासून असा विश्‍वास आहे की, देव किंवा देवता विविध प्रसंगी, विविध नावांनी आणि विविध शस्‍त्रांसमवेत प्रकट होतात. त्‍यामुळे एका हिंदूला मशीद, चर्च किंवा गुरुद्वारा यांमध्‍ये प्रवेश करण्‍यास काहीच अडचण वाटत नाही; कारण ते काहीतरी पाप करत आहेत, असे त्‍यांना वाटत नाही. त्‍यामुळेच जगात छळण्‍यात आलेल्‍या प्रत्‍येक धार्मिक अल्‍पसंख्‍यांकांना भारतात आश्रय मिळाला. ख्रिस्‍ती, सीरिया किंवा अरबमधून पळून गेलेला ख्रिस्‍ती समुदाय, तुर्कीयेच्‍या नरसंहारातून पळून गेलेले आर्मेनियन लोक, इराणमधून बाहेर पडलेले पारशी यांपासून ज्‍यूपर्यंत अनेक पंथांच्‍या लोकांना भारताने आश्रय दिला आहे. भारत हा जगातील एकमेव देश आहे, जेथे त्‍यांचा छळ झाला नाही. आज तिबेटींनी चिनी लोकांच्‍या छळापासून पलायन केले आणि त्‍यांनी त्‍यांचे धार्मिक नेते दलाई लामा यांच्‍याभोवती भारतातच एक ‘मिनी तिबेट’ निर्माण केले आहे.

मी एक पत्रकार आणि विदेशी गोरा व्‍यक्‍ती म्‍हणून भारतामध्‍ये नेहमीच संपूर्ण स्‍वातंत्र्याचा अनुभव घेतला आहेे. येथे माझी कधीच फसवणूक झाली नाही; कारण वॉशिंग्‍टनच्‍या उपनगरात आपली फसवणूक होण्‍याची शक्‍यता असते. भारतात पोलिसांनी रस्‍त्‍यावर मला कधीही कागदपत्रे विचारली नाहीत. ज्‍याप्रमाणे पॅरिसमधील मेट्रोमध्‍ये नॉन-कॉकेशियनला (कृष्‍णवर्णीय) होऊ शकते ! भारतात मी मुक्‍तपणे लिहू शकलो आहे. मी येथील सरकारवर टीकाही केली आहे. या पार्श्‍वभूमीवर जेव्‍हा मी अमेरिकेत गेल्‍या वर्षी झालेल्‍या संमेलनामध्‍ये (‘डिसमेंटलींग ग्‍लोबल हिंदुत्‍व’ म्‍हणजेच हिंदुत्‍वाचे जागतिक उच्‍चाटन परिषदेत) ‘हिंदुत्‍वाची तुलना नाझी तत्त्वज्ञाना’शी केलेली आणि लोकशाही पद्धतीने निवडलेले ‘भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना हिटलर’शी किंवा ‘हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांची तुलना तालिबान’शी होतांना पहातो, तेव्‍हा माझे हृदय तुटते आणि मला चीड येते. अशी तुलना होऊच शकत नाही, हे भारतात रहाणारा कुणीही खात्री करून घेऊ शकतो. अमेरिकेतील ‘वर्ल्‍ड ट्रेड सेंटर’वरील आक्रमणाच्‍या स्‍मरणदिनी ‘डिसमेंटलींग ग्‍लोबल हिंदुत्‍व’ परिषद आयोजित करणे, हे तेवढेच निंदनीय आहे.

३. इंग्रजांनी हिंदूंविषयी जगात नकारात्‍मकता निर्माण करणे

खरेतर अनेकांची मुख्‍य समस्‍या भारताचा इतिहास, संस्‍कृती, तत्त्वज्ञान आणि साहित्‍य यांचा अभ्‍यास करण्‍यात आहे. ब्रिटिशांनी मोरटायमर व्‍हीलरच्‍या नेतृत्‍वाखाली एक इंडॉलॉजी (विद्याशास्‍त्र) यंत्रणा निर्माण केली, ज्‍यायोगे त्‍यांनी भारताची प्राचीन संस्‍कृती, अवशेष, मंदिरे इत्‍यादींमध्‍ये रस दाखवला; परंतु त्‍यांनी नेहमीच ख्रिस्‍ती संस्‍कृतीला वरचढ दाखवले. ज्‍यांच्‍या नावावर भारतात असंख्‍य रस्‍त्‍यांची नावे आहेत, त्‍या मॅक्‍समुलर या प्रसिद्ध इतिहासकार आणि साहित्‍यकार यांनी त्‍यांच्‍या पत्नीला एक पत्र लिहून म्‍हटले, ‘येशू ख्रिस्‍त हाच एकमेव खरा देव आहे आणि हिंदु निधर्मी आहेत.’ आजचे आधुनिक इतिहासकार तीच मानसिकता बाळगून आहेत आणि जाणीवपूर्वक ‘भारतीय एक निकृष्‍ट दर्जाचा वंश आहे’, यावर विश्‍वास ठेवतात.

४. भारत सर्वार्थाने जागतिक महासत्ता बनेल !

या देशात मी ४० वर्षे राहिलो आहे. मी भारताच्‍या उत्तर ते दक्षिण आणि अरुणाचल प्रदेशातील चिनी सीमेपर्यंत मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. मला जगात असे लोक कधीही सापडले नाहीत, जे अतिशय मैत्रीपूर्ण, मोकळे आणि सहनशील आहेत. माझा विश्‍वास आहे की, स्‍वामी विवेकानंद किंवा श्री योगी अरविंद यांनी भाकित केल्‍याप्रमाणे ‘भारत केवळ जगाचा आध्‍यात्‍मिक नेताच नाही, तर आर्थिक, लष्‍करी आणि राजकीय महासत्ता बनेल.’ ज्‍यांनी चीनच्‍या विरोधात अध्‍यात्‍म जिवंत ठेवले, अशा लोकांना हिंदू म्‍हटले जाते.

जसे महान श्री योगी अरविंद प्रकट झाले आणि ते म्‍हणाले, ‘‘हे हिंदु धर्माचे सत्‍य आहे. हाच धर्म आहे, जो मी जगासमोर उभा करत आहे. मी ऋषीमुनी, संत आणि अवतार यांच्‍यामुळे परिपूर्ण अन् विकसित झालो आहे अन् आता मी राष्‍ट्रामध्‍ये माझे कार्य करण्‍यासाठी पुढे जात आहे. माझा शब्‍द पुढे पाठवण्‍यासाठी मी या राष्‍ट्राला वाढवत आहे. हा सनातन धर्म आहे की, जो शाश्‍वत आहे आणि तो तुम्‍हाला आधी ठाऊक नव्‍हता; परंतु तो मी आता तुमच्‍यासाठी प्रकट केला आहे.’’ अशा प्रकारे तुमची इच्‍छा असल्‍यास तुम्‍ही मला ‘हिंदुत्‍वाचा सैनिक’ म्‍हणू शकता.

– फ्रान्‍सुआ गोतिए, फ्रेंच पत्रकार