सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले करत असलेल्‍या ज्ञानभंडार्‍यात सेवा करण्‍याची संधी मिळत असल्‍याने त्‍यांच्‍या चरणकमली कृतज्ञता व्‍यक्‍त होणे

‘मी लिखाणाच्‍या संकलनाची सेवा करण्‍यासाठी काही दिवस रामनाथी, गोवा येथील सनातनच्‍या आश्रमात गेले होते. एकदा मी आश्रमातील ध्‍यानमंदिरात नामजप करत होते. मी ध्‍यानमंदिरातील प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या मोठ्या छायाचित्राकडे पहात होते. त्‍या वेळी महाप्रसादाची वेळ झाली.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

१. साधिकेच्‍या मनात ‘प.पू. भक्‍तराज महाराज यांना भंडारा करण्‍याची आवड असणे; मात्र स्‍वतः (साधिका) महाप्रसाद बनवण्‍यात साहाय्‍य करत नाही’, असे विचार येणे

सौ. कविता बेलसरे

मी थोडी नाराज होते. त्‍या वेळी माझ्‍या मनात विचार आले, ‘मी महाप्रसाद घेण्‍यासाठी आयती जाते. मी महाप्रसाद बनवतांना काही साहाय्‍य करत नाही. मी केवळ संगणकीय सेवा करते. मला घरीही स्‍वयंपाक करायला आवडत नाही. मी स्‍वयंपाकघरात अधिक सेवा कधीच केली नाही. प.पू. भक्‍तराज महाराज यांना भंडारा करण्‍याची आवड होती. मला मात्र त्‍याची आवड नाही. मी कधीच भंडार्‍याची सेवा करू शकत नाही.’ माझ्‍या मनाची नकारात्‍मक स्‍थिती झाली होती. मी प.पू. भक्‍तराज महाराज यांच्‍या छायाचित्राकडे पहात होते.

२. ‘प.पू. भक्‍तराज महाराज सूक्ष्मातून ‘प.पू. डॉक्‍टर ज्ञानाचा भंडारा करत आहेत’, असे सांगत आहेत’, असे जाणवणे आणि या ज्ञानभंडार्‍यात सेवा करत असल्‍याने साधिकेला कृतज्ञता वाटणे

अकस्‍मात् माझ्‍या मनातील विचार पालटले. मला जाणवले, ‘प.पू. बाबा (प.पू. भक्‍तराज महाराज) सूक्ष्मातून मला सांगत आहेत, ‘प.पू. डॉक्‍टर ज्ञानाचा भंडारा करत आहेत. हा अधिक सूक्ष्म स्‍तरावरील भंडारा असल्‍याने अनेक दृश्‍य-अदृश्‍य जीव या ज्ञानभंडार्‍याने तृप्‍त होऊन मोक्षाकडे जात आहेत. अखिल ब्रह्मांडासाठी हा ज्ञानभंडारा चालू आहे.’ त्‍या वेळी मला कृतज्ञता वाटली.

‘मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ज्ञानभंडार्‍यात (ग्रंथांचे संकलन करण्‍यात) अल्‍प प्रमाणात का होईना सेवा करण्‍याची संधी मिळत आहे. त्‍यामुळे मी भंडार्‍याचीच सेवा करत आहे’, असे विचार येऊन मला पुष्‍कळ सकारात्‍मक वाटले. माझ्‍या मनातील न्‍यूनगंड दूर होऊन माझा आत्‍मविश्‍वास वाढला.

प.पू. डॉक्‍टर, तुम्‍हीच माझ्‍या मनातील नकारात्‍मक विचार दूर करून मला सेवेत ठेवत आहात, तसेच मला सेवेची संधी देऊन माझा उद्धार करत आहात. त्‍याबद्दल तुमच्‍या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. कविता बेलसरे, पुणे (२४.९.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक