बनावट नोटा सिद्ध करणार्‍या टोळीकडून साडे बारा लाख रुपयांंचा मुद्देमाल जप्‍त !

कोल्‍हापूर – येथील पोलिसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने बनावट नोटा सिद्ध करणार्‍या ४ जणांकडून संगणक, प्रिंटर आणि अन्‍य साहित्‍य असा १२ लाख ६२ सहस्र ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्‍त केला. कोल्‍हापूर-गगनबावडा मार्गावरील मरळी फाटा येथे ही कारवाई करण्‍यात आली. संशयित चंद्रशेखर बाळासाहेब पाटील, अभिजित राजेंद्र पवार, दिग्‍विजय कृष्‍णा पाटील यांच्‍याकडे पडताळणी करण्‍यात आली, तसेच बनावट नोटा सिद्ध करणारा संदीप कांबळे याच्‍या घरात ४ लाख ४५ सहस्र रुपयांच्‍या ५०० आणि १०० रुपयांच्‍या बनावट नोटा आढळल्‍या आहेत. पोलिसांनी संशयित आरोपींच्‍या विरोधात कळे पोलीस ठाणे येथे गुन्‍हा नोंद केला आहे.

संपादकीय भूमिका 

देशाची अर्थव्‍यवस्‍था खिळखिळी करणार्‍यांना कठोरात कठोर शिक्षा कधी होणार ?