कोल्हापूर – विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती, तसेच हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी यांच्या पाठपुराव्यानंतर विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याच्या दृष्टीने काही पावले उचलली जात असतांनाच विशाळगडावर परत एकदा नवीन शेड बांधून अतिक्रमण चालूच असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. छत्रपती अहिल्याबाई यांच्या समाधीशेजारी कोंबड्या कापण्यासाठी हे शेड सिद्ध करण्यात येत आहे, असा आरोप शिवप्रेमींनी केला आहे. एवढे मोठे अतिक्रमण होत असतांना पुरातत्व विभागाचे अधिकारी नेमके काय करतात ? असा प्रश्न संतप्त शिवप्रेमींनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात शिवदुर्ग आंदोलनाचे श्री. हर्षल सुर्वे म्हणाले, ‘‘एकीकडे प्रशासनाने विशाळगडावरील अतिक्रमण महाशिवरात्रीपर्यंत काढण्याचे आश्वासन दिले आहे, दुसरीकडे मात्र गड पुरातत्व विभागाच्या कह्यात असतांना विनाअनुमती तेथे अतिक्रमण चालूच असल्याचे दिसते. तेथील अतिक्रमणधारकांना प्रशासनाचा कोणताही धाक नसल्याचे यातून सिद्ध होते. या अनधिकृत अतिक्रमणाविषयी संबंधित अधिकारी यांना छायाचित्र आणि चलचित्र पाठवण्यात आले. यानंतर तेथील तहसीलदारांकडून हे काम बंद करण्यात आले आहे.’’
संपादकीय भूमिका
|