‘अ‍ॅप’मधील माहिती सामान्‍य हिंदूंच्‍या दैनंदिन जीवनात मार्गदर्शक ! – महर्षि आनंद गुरुजी, प्रख्‍यात ज्‍योतिषी

‘सनातन पंचांग २०२३’च्‍या कन्‍नड भाषेतील ‘अ‍ॅप’चे लोकार्पण !

कन्‍नड भाषेतील ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे लोकार्पण करतांना महर्षि आनंद गुरुजी

बेंगळुरू (कर्नाटक) – सनातन संस्‍था निर्मित ‘सनातन पंचांग २०२३’च्‍या कन्‍नड भाषेतील ‘अँड्रॉईड अ‍ॅप’चे लोकार्पण महर्षि आनंद गुरुजी यांच्‍या शुभहस्‍ते ५ जानेवारीला करण्‍यात आले. या प्रसंगी महर्षि आनंद गुरुजींचे सुपुत्र श्री. श्रीनिवास शर्मा गुरुजी, सनातनच्‍या साधिका सौ. सुधा सदानंद आणि अन्‍य उपस्‍थित होते.

या वेळी महर्षि आनंद गुरुजी म्‍हणाले की, ‘सनातन पंचांग २०२३’च्‍या अ‍ॅपमध्‍ये पंचांग आणि शुभ मुहूर्त, सण-व्रते, धर्मशिक्षण, राष्‍ट्र-धर्म रक्षण, आयुर्वेद आदी विविध विषयांवर उपयुक्‍त माहिती देण्‍यात आली आहे. विविध माहिती असलेले हे ‘अ‍ॅप’ सामान्‍य हिंदूंना दैनंदिन जीवनात मार्गदर्शक आहे. सर्व भारतियांनी हे ‘अ‍ॅप डाऊनलोड’ करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोचवावे.