डोंबिवली (जिल्‍हा ठाणे) येथील ‘संगीत अलंकार’ या पदवीने विभूषित असणारे पू. किरण फाटक यांची कु. मधुरा भोसले यांना जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये !

गायनसाधना
पू. किरण फाटक

१. पू. किरण फाटककाका यांच्‍यावरील श्रीसरस्‍वतीदेवीच्‍या कृपेमुळे त्‍यांना संगीतातील गायनकलेचे पूर्ण ज्ञान प्राप्‍त झालेले असणे

पू. किरण फाटककाका यांच्‍यावर जन्‍मत:च श्रीसरस्‍वतीदेवीची कृपा आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये श्रीसरस्‍वतीदेवीची ज्ञानशक्‍ती आकाशतत्त्वाच्‍या द्वारे कार्यरत झालेली आहे. त्‍यामुळे त्‍यांना संगीतातील गायनकलेचे पूर्ण ज्ञान प्राप्‍त झालेले आहे. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या मनामध्‍ये श्रीगुरु आणि देवता यांच्‍याप्रती असलेल्‍या भावामुळे त्‍यांना श्रीगुरु आणि देवता यांच्‍यावरील अनेक काव्‍ये स्‍फुरतात. त्‍यामुळे त्‍यांनी श्रीगुरु आणि देवता यांच्‍यावर अनेक बंदिशी रचलेल्‍या आहेत. त्‍यांना संगीतकलेसह काव्‍यकलाही अवगत झालेली आहे.

२. पू. फाटककाका यांचे गायन आणि मार्गदर्शन चालू असतांना स्‍वामी समर्थांचे सूक्ष्मातून अस्‍तित्‍व जाणवणे

जेव्‍हा पू. फाटककाका यांचे गायन आणि मार्गदर्शन चालू असते, तेव्‍हा त्‍यांच्‍या ठिकाणी स्‍वामी समर्थांचे अस्‍तित्‍व सूक्ष्मातून जाणवते. त्‍यामुळे पू. फाटककाकांचे गायन ऐकत असतांना स्‍वामी समर्थांची आठवण येऊन त्‍यांच्‍या प्रतीचा भाव जागृत होतो.

३. पू. फाटककाका त्‍यांचे गुरु स्‍वामी समर्थ यांच्‍याशी एकरूप झाल्‍यामुळे काही वेळा त्‍यांचा चेहरा स्‍वामी समर्थांप्रमाणे दिसणे

कु. मधुरा भोसले

पू. फाटककाका यांच्‍यामध्‍ये इतका शिष्‍यभाव आहे की, ते त्‍यांचे गुरु स्‍वामी समर्थ यांच्‍याशी एकरूप झाल्‍याचे जाणवते. त्‍यामुळे काही वेळा त्‍यांचा चेहरा स्‍वामी समर्थांप्रमाणे दिसतो.

४. पू. फाटककाका संत असल्‍यामुळे त्‍यांचे कार्य अस्‍तित्‍वाच्‍या स्‍तरावर चालू असल्‍याची प्रचीती येणे

पू. काकांचे सूक्ष्मातील कार्य अस्‍तित्‍वाच्‍या स्‍तरावर कार्यरत झाल्‍यामुळे त्‍यांचे आश्रमात आगमन होण्‍यापूर्वीच आश्रमातील वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या साधकांवर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होऊन वाईट शक्‍तींचा त्रास होत होता. त्‍यामुळे ते कार्यक्रमस्‍थळी येण्‍यापूर्वी, म्‍हणजे प्रयोगापूर्वी आणि ते कार्यक्रमस्‍थळाहून गेल्‍यावर, म्‍हणजे प्रयोगानंतर व्‍यासपिठावर पिवळसर केशरी रंगाची कड असलेला पारदर्शक गोळा दिसतो. त्‍यामुळे पू. फाटककाका प्रयोगाच्‍या ठिकाणी येण्‍यापूर्वी आणि येऊन गेल्‍यानंतर प्रयोगाला उपस्‍थित असणार्‍या साधकांवर आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय होत होते.

५. पू. काकांच्‍या देहातून जनलोकाचा चैतन्‍यदायी पिवळसर रंगाचा दैवी प्रकाश वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरण दैवी होणे

पू. काका संत असल्‍यामुळे त्‍यांच्‍याभोवती जनलोकाचे वायूमंडल सूक्ष्मातून निर्माण झाले होते. त्‍यामुळे पू. काका जेव्‍हा कार्यक्रमस्‍थळी यायचे, तेव्‍हा त्‍यांच्‍या देहातून जनलोकाचा चैतन्‍यदायी पिवळसर रंगाचा दैवी प्रकाश वातावरणात प्रक्षेपित होऊन वातावरण दैवी होत असे.

६. जेव्‍हा पू. काका गात होते, तेव्‍हा त्‍यांच्‍या बंदिशीतून शब्‍दब्रह्म, रागांचे चलन करतांना केलेला स्‍वरविस्‍तार आणि ‘तराना’ यांतून स्‍वरब्रह्म अन् आलाप आणि तंबोर्‍याचा नाद यांतून ‘नादब्रह्म’ यांची अनुभूती आली.

६ अ. बंदिश, स्‍वरविस्‍तार आणि तराना, आलाप आणि तंबोर्‍याचा नाद (पार्श्‍वध्‍वनी) यांची आध्‍यात्मिक वैशिष्‍ट्ये

७. पू. फाटककाकांच्‍या भोवती असणार्‍या संरक्षककवचामुळे त्‍यांचे वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होणे

स्‍वामी समर्थाच्‍या कृपेने त्‍यांच्‍याभोवती पिवळसर केशरी रंगाचे वलय कार्यरत झाले होते. त्‍यामुळे त्‍यांच्‍याभोवती दैवी शक्‍तीचे संरक्षककवच कार्यरत झाले होते. त्‍यामुळे संगीताच्‍या प्रयोगांच्‍या वेळी जेव्‍हा त्‍यांच्‍यावर विविध प्रकारच्‍या वाईट शक्‍ती सूक्ष्मातून आक्रमण करत होत्‍या, तेव्‍हा त्‍यांच्‍याभोवती असणार्‍या संरक्षककवचामुळे त्‍यांचे वाईट शक्‍तींच्‍या आक्रमणांपासून रक्षण होत होते.

८. पू. फाटककाकांच्‍या गायनाची वैशिष्‍ट्ये

८ अ. पू. काकांनी रचलेल्‍या बंदिशींमध्‍ये भक्‍तीरस ओतप्रोत भरलेला असल्‍याने त्‍यांच्‍या बंदिशी ऐकल्‍यावर ऐकणार्‍यांचा श्रीगुरु आणि देवता यांच्‍या प्रती असणारे विविध प्रकारचे भाव जागृत होणे : त्‍यांना संगीताचे ज्ञान असण्‍यासह त्‍यांच्‍या मनात श्रीगुरु आणि देवता यांच्‍या प्रतीही अनन्‍यभाव आहे. त्‍यामुळे जेव्‍हा ते श्रीगुरु किंवा देवता यांच्‍यावर रचलेल्‍या बंदिशी गात होते, तेव्‍हा त्‍यामध्‍ये भक्‍तीरस ओतप्रोत भरलेला जाणवत असे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या बंदिशी ऐकल्‍यावर ऐकणार्‍यांचा श्रीगुरु आणि देवता यांच्‍या प्रती असणारे विविध प्रकारचे भाव जागृत होत असे.

८ आ. संगीताच्‍या सखोल ज्ञानामुळे पू. फाटककाकांना स्‍वरांशी सहजरित्‍या खेळता येणे : त्‍यांना स्‍वरांचे इतके ज्ञान आहे की, ते स्‍वरांशी सहजरित्‍या खेळत होते. स्‍वर त्‍यांच्‍या मनोदेहाशी एकरूप झाल्‍याचे जाणवले. त्‍यामुळे त्‍यांच्‍या रोमारोमातून संगीताची स्‍पंदने वातावरणात प्रक्षेपित होत होती. त्‍यांचे संपूर्ण अस्‍तित्‍वच संगीतमय झाल्‍याचे जाणवते.

८ इ. पू. काकांमध्‍ये असणार्‍या विविध प्रकारच्‍या भावांमुळे त्‍यांचे गायन ऐकत असतांना भगवंताप्रतीचा भाव जागृत होणे : त्‍यांच्‍यामध्‍ये समर्पितभाव, कृतज्ञताभाव, उत्‍कटभाव, विनम्रभाव इत्‍यादी विविध प्रकारचे भाव आहेत. विविध प्रकारच्‍या बंदिशी गात असतांना त्‍यातून भक्‍तीरस आणि पश्‍यंती वाणीमुळे चैतन्‍य या दोन्‍ही घटकांची अनुभूती येत होती. त्‍यामुळे त्‍यांचे गायन ऐकत असतांना भगवंताप्रतीचा भाव जागृत होऊन त्‍यांच्‍याकडून प्रक्षेपित झालेले चैतन्‍य ग्रहण होऊन भक्‍ती आणि चैतन्‍य यांची संमिश्र अनुभूती येत असे.

८ ई. पू. फाटककाकांच्‍या गायनातून प्रक्षेपित झालेल्‍या चैतन्‍यामुळे केवळ चक्रशुद्धी आणि नाडीशुद्धी होत नसून श्रोत्‍यांच्‍या सूक्ष्म देहांचीही शुद्धी होणे : त्‍यांच्‍या गायनातून प्रक्षेपित झालेल्‍या चैतन्‍यामुळे केवळ चक्रशुद्धी आणि नाडीशुद्धी होत नसून श्रोत्‍यांच्‍या सूक्ष्म देहांचीही शुद्धी होत असते. त्‍यामुळे गायन ऐकल्‍यावर देहाचे वजन उणावून देह आणि मन दोन्‍ही हलके झाल्‍याचे जाणवते अन् त्‍यांचे गायन ऐकल्‍यावर विविध प्रकारच्‍या अनुभूती येतात.

८ उ. पू. फाटककाकांच्‍या गायनामध्‍ये सामर्थ्‍य असल्‍याचे जाणवणे : त्‍यांच्‍या संगीतातून सगुण आणि मारक शक्‍ती प्रक्षेपित झाल्‍यामुळे साधकांतील वाईट शक्‍तींना त्रास होत होता. त्‍याचप्रमाणे त्‍यांच्‍या संगीतातून निर्गुण आणि तारक शक्‍ती प्रक्षेपित झाल्‍यामुळे साधकांमधील वाईट शक्‍ती शांत होत होत्‍या. त्‍यांच्‍या गायनामध्‍ये सामर्थ्‍य असल्‍याचे जाणवले.

९. पू. फाटककाकांची संगीतयोगांतर्गत कर्मयोग, भक्‍तीयोग आणि ज्ञानयोग या तिन्‍ही योगमार्गांनुसार साधना झालेली असणे

९ अ. संगीतयोगांतर्गत कर्मयोगानुसार साधना होणे : पू. फाटककाकांनी अनेक वर्षे भारतीय शास्‍त्रीय संगीतातील विविध रागांचा सराव केलेला आहे. त्‍यामुळे त्‍याची संगीतयोगांतर्गत कर्मयोगाची साधना झालेली आहे.

९ आ. संगीतयोगांतर्गत भक्‍तीयोगानुसार साधना होणे : त्‍याचप्रमाणे त्‍यांना स्‍वामी समर्थांच्‍या संदर्भात अनुभूती येऊन त्‍यांची कृपा प्राप्‍त झाल्‍यामुळे त्‍यांच्‍यामध्‍ये श्रीगुरूंप्रतीचा भाव जागृत झाला. त्‍यामुळे त्‍यांच्‍या संगीताला भावाची जोड मिळून त्‍याची संगीतयोगांतर्गत भक्‍तीयोगाची साधना झालेली आहे.

९ इ. संगीतयोगांतर्गत ज्ञानयोगानुसार साधना होणे : श्री सरस्‍वतीदेवीच्‍या कृपेने त्‍यांना भारतीय शास्‍त्रीय संगीताचे सखोल ज्ञान मिळाले आहे. त्‍यामुळे पू. काकांची संगीतकला ज्ञानाने युक्‍त झालेली आहे. त्‍यामुळे पू. काकांची संगीतयोगांतर्गत ज्ञानयोगानुसार साधना झालेली आहे.
अशाप्रकारे पू. काकांची संगीतयोगाच्‍या अंतर्गत कर्मयोग, भक्‍तीयोग आणि ज्ञानयोग यांनुसार साधना होऊन त्‍यांना परिपूर्ण संगीतकला अवगत झालेली आहे.

१०. पू. काकांचा अहं अत्‍यंत अल्‍प असणे

पू. काकांचा अहं अत्‍यंत अल्‍प आहे. त्‍यामुळे त्‍यांच्‍या वागण्‍यातून आणि बोलण्‍यातून पुष्‍कळ प्रमाणात विनम्रता जाणवते.

११. साधकांच्‍या प्रती पुष्‍कळ प्रीती असणे

पू. काकांमध्‍ये पुष्‍कळ प्रमाणात प्रीती आहे. त्‍यामुळे ते प्रयोगाला आलेल्‍या साधकांनी जेवण किंवा अल्‍पाहार केलेला आहे का ? किंवा वाईट शक्‍तींचा त्रास असणार्‍या साधकांना बरे वाटते का ? याची ते अत्‍यंत आपुलकीने विचारपूस करत होते.

१२. पू. काकांची भेट परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या संगीत कलेला अध्‍यात्‍माची जोड मिळणे आणि त्‍यांची वाटचाल पुढच्‍या दिशेने चालू होणे

पू. काकांची भेट परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांच्‍याशी झाल्‍यामुळे त्‍यांच्‍या संगीत कलेला अध्‍यात्‍माची जोड मिळाली आहे. त्‍यामुळे त्‍यांची संगीतकला आता अधिकाधिक आध्‍यात्मिक स्‍तरावर होऊन त्‍यांची वाटचाल पुढच्‍या दिशेने चालू झालेली आहे.

कृतज्ञता : श्रीगुरूंच्‍या कृपेने पू. फाटककाका यांची वरील गुणवैशिष्‍ट्ये जाणवली’, यासाठी मी श्रीगुरूचरणी कोटीश: कृतज्ञ आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्‍यात्मिक पातळी ६४ टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.४.२०२०)

  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे सूक्ष्म. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या सूक्ष्म संवेदना जाणवतात. या सूक्ष्माच्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.