जनतेला आमिषे दाखवण्याची धोकादायक राजकीय संस्कृती !

१. निवडून येण्यासाठी जनतेला आमिषांची सवय लावणे देशासाठी चिंताजनक !

‘असे वाटते जसे राजकीय पक्षांकडे विकासाच्या कार्यक्रमांचा अभाव आहे. त्यांना जनतेला खोटी अश्वासने देऊन कसेही करून मते मिळवायची आहेत. ही एक अशी चुकीची परिवाट असते, जिच्यावर चालून सत्ता तर मिळवता येते; पण शेवटी देशालाच मोठी हानी सोसावी लागते. जेव्हा राजकीय पक्षांकडे कोणत्याही अन्य विरोधी पक्षाच्या पराभवासाठी  ठोस कार्यक्रम नसतो, तेव्हा ते आमिषे दाखवण्याचा सोपा मार्ग अवलंबतात. त्यांच्या भ्रमजाळात फसून जनता राजकीय पक्षांच्या गुन्हेगारीचा विषय विसरून जाते, तसेच तिला निवडणुकीतील भ्रष्टाचारातही ‘शिष्टाचार’ दिसू लागतो. जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा ‘एक मोठी बाजारपेठ’, अशी होत आहे. गुजरातशी संबंधित लोक व्यापार क्षेत्रात संपूर्ण जगावर राज्य करत आहेत. तथापि विनामूल्य योजनांच्या माध्यमांमुळे निवडणुकीवर परिणाम होत असेल, तर ते भारतासाठी अतिशय चिंतेचे आहे.

२. भारतीय बाजारपेठेवर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनने डाव्यांच्या माध्यमातून देशातील उद्योग बंद पाडणे

या फुकटेगिरीमुळे केवळ भारताचा व्यापारच नाही, तर येथील उत्पादनांवरही परिणाम होईल. बंगालमध्ये डाव्यांच्या गटाने ‘ट्रेड युनियन’च्या माध्यमातून भांडवलदारांना विरोध केला होता. तेव्हा भारताचे मोठमोठे कारखाने बंद झाले. यामागील कारण की, मागणी आणि पुरवठा यांच्या या खेळात मागणी तेवढीच राहिली; पण पुरवठा अल्प झाला. त्यामुळे भारतीय बाजारात चिनी उत्पादने आली. विदेशी शक्ती बाजारात स्वत:चे पाय रोवण्यासाठी असे खेळ करतात, ज्यात राजकीय पक्ष सत्ताप्राप्तीच्या लोभापायी त्यांची प्यादी बनतात. भारतावर केवळ प्रत्यक्ष विदेशी आक्रमणे होत नाहीत, तर विदेशी शक्ती कधी बाजाराच्या माध्यमातून, तर कधी जनतेमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण करून सत्तेवर नियंत्रण ठेवतात. आंतरराष्ट्रीय राजकारण देशात असंतोष निर्माण करून त्यांचे हित साधत असते. पंजाबमध्ये वेगळ्या खलिस्तानचे सूत्र सरकार बनवण्याचा प्रमुख विषय म्हणून पुढे आले होते. यात कॅनडाचे नागरिक साहाय्य करत होते. काही वर्षांपूर्वी झालेल्या ‘किसान आंदोलना’च्या वेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी त्याच्या समर्थनार्थ वक्तव्यही केले होते.

आता भारतावर सीमेपलीकडून नाहीत, तर बौद्धीक स्तरावर आक्रमणे होत आहेत. हे लोक भारताची सभ्यता आणि संस्कृती नाकारत आहेत. भारतात कुठे ना कुठे नेहमीच निवडणुका होत असतात. त्यामुळे निवडणुकीच्या रणधुमाळीत नेहमीच असे विषय दबून जातात, ज्यांचे देशावर दूरगामी वाईट परिणाम होतात.

३. निवडणुकांपूर्वी विदेशातील ‘विद्वानां’नी हिंदु धर्मविरोधी सिद्धांत मांडणे      

 

अलीकडेच हॉवर्ड विश्वविद्यालयाच्या काही ‘विद्वानां’नी ‘क्रिटिकल रेस थेअरी’ नावाचा नवीन सिद्धांत मांडला आहे. या सिद्धांतानुसार ‘सध्याची व्यवस्था दूषित झाली आहे. समाजातील व्यवस्थेमुळे अन्याय आणि शोषण होत आहे.’ वरवर पहाता हा सिद्धांत ठीक वाटत असला, तरी त्यापुढे पाहिल्यावर या सिद्धांताचा उद्धेश लक्षात येतो. या सिद्धांतानुसार ‘हिंदु धर्म नष्ट केला पाहिजे; कारण ही एक जातीवर आधारित व्यवस्था आहे. यात एक वर्ग दुसर्‍याचे शोषण करतो. ही पुरुषप्रधान व्यवस्था असून यात महिलांचा छळ आणि शोषण होते. हिंदु धर्मगुरु वाईट आहेत. त्यांना पदच्युत केले पाहिजे. संस्कृत भाषेचा त्याग केला पाहिजे; कारण ही भाषा मृत झाली आहे. हिंदु सणांचे काही औचित्य नाही; कारण त्यांच्यामुळे पाण्याची नासाडी आणि प्रदूषण होते.’ हा सिद्धांत वेदांविषयी असे म्हणतो की, ‘यातील लिखाण हे हिंदु धर्माचे दुबळेपण, अन्याय आणि शोषण यांचा आधार आहे. वेदाध्ययन आणि पठण त्वरित बंद केले पाहिजे.’

असा सिद्धांत वाचून स्वतःची विचारसरणी बनवणारी व्यक्ती भारताच्या हिताचा विचार कसा करील ? असे विचार निवडणुकांच्या वेळीच उगम पावतात, जेव्हा निवडणुका होतात आणि जेथील अधिकाधिक लोक विदेशात रहातात. पंजाब राज्यातील निवडणुकी पूर्वी शेतकरी आंदोलनाच्या नावावर मोठा गोंधळ झाला. सरकारने कायदे मागे घेऊनही कथित आंदोलनकत्र्या शेतकर्‍यांनी आंदोलन चालूच ठेवले. पंजाबमधील निवडणूक संपल्यानंतर ना कधी आंदोलक दिसले, ना त्यांची बाजू घेणारे ! आता महत्त्वाचे राज्य गुजरात आहे. गुजरातचा मोठा वर्ग विदेशात रहातो. त्यांचे कुटुंब आणि नातेवाईक भारतात रहातात. वरील प्रकारचा हिंदुद्वेषी सिद्धांत म्हणजे विदेशात रहाणार्‍या भारतियांच्या माध्यमातून देशात रहात असलेल्या त्यांच्या परिचितांवर परिणाम करण्याचा प्रयत्न असतो.’

– अमित त्यागी
(लेखक ज्येष्ठ स्तंभलेखक आणि सामाजिक चिंतक आहेत.)