व्‍यक्‍तीला येणारा तणाव आणि वैद्यकीय दृष्‍टीकोनातून ध्‍यानामुळे होणारे लाभ !

‘काही विकार न उद़्‍भवणे आणि झाल्‍यास ते नियंत्रणात रहाणे’,  यासाठी ‘ध्‍यान’ महत्त्वाचे आहे. ‘काही विकार होणे किंवा ते नियंत्रणात न रहाणे’, याला जीवनातील तणाव हे एक महत्त्वाचे कारण आहे. ‘जीवनातील तणाव देहक्रियांवर कसा परिणाम करतो ? आणि त्‍यातून नंतर विकार कसे उद़्‍भवतात ?’ अन् ‘ध्‍यानामुळे त्‍यावर नेमका कसा उपाय होतो ?’, हे समजून घेतले, तर ध्‍यान परिणामकारक होण्‍यासाठी आपण अधिक प्रयत्न करू. या लेखात आपण ‘तणावासंबंधी काही सूत्रे आणि वैद्यकीय दृष्‍टीने ध्‍यानाचे लाभ’, यांविषयी थोडक्‍यात जाणून घेऊया.  

१. तणावासंबंधी काही सूत्रे

१ अ. तणाव म्‍हणजे काय ? : तणाव म्‍हणजे वास्‍तव किंवा काल्‍पनिक परिस्‍थिती (तणावजनक गोष्‍टींना) याला तोंड देण्‍याची अपुरी क्षमता किंवा अभाव.

१ आ. तणावातील मूलभूत घटक : ‘तणावजनक सूत्र, त्‍याला सामोरे जाणारी व्‍यक्‍ती आणि व्‍यक्‍तीचा प्रतिसाद’, हे तणाव प्रक्रियेतील घटक होत.

१ इ. तणावाच्‍या घटकांसंबंधी काही महत्त्वाची सूत्रे 

१. एकाच तणावजनक सूत्रामुळे होणारा परिणाम सर्वांवर सारखाच होईल असे नाही.

२. जीवनातील सकृतदर्शनी चांगल्‍या वाटणार्‍या घटनाही तणाव निर्माण करतात, उदा. विवाह होणे, मूल होणे.

३. काही प्रसंगी एक आव्‍हान समजून व्‍यक्‍ती तणावाला सामोरे जाते आणि त्‍यातून बरेच काही शिकते. हा तणावाचा सकारात्‍मक परिणाम झाला. काही प्रसंगी तणाव न पेलवल्‍याने व्‍यक्‍तीवर नकारात्‍मक परिणाम होतो.

४. एखादे आव्‍हान सकृतदर्शनी व्‍यक्‍तीने पेलले, असे दिसले, तरीही तसे करतांनाही तिच्‍यावर काही परिणाम होतो.

डॉ. दुर्गेश सामंत

२. वैद्यकीय दृष्‍टीने ध्‍यानाचे लाभ

व्‍यक्‍तीने नियमित ध्‍यानाचा अभ्‍यास केल्‍यास तिच्‍यावरील ताण न्‍यून होऊन तिला पुढील लाभ होतात.

अ. व्‍यक्‍तीला तिच्‍या भावनांवर नियंत्रण ठेवता येते.

आ. तिच्‍या एकाग्रतेत वाढ होते.

इ. तिचा आत्‍मविश्‍वास वाढतो.

ई. तिच्‍यावरील तणाव न्‍यून होतो.

उ. तिच्‍यातील रोगप्रतिकारक शक्‍ती वाढते.

ऊ. तिच्‍यातील निद्रा-जागृती चक्र (टीप) सुस्‍थापित होण्‍यास साहाय्‍य होते.

टीप : निद्रा-जागृती चक्र : शरिरात अनुमाने ‘८ घंटे निद्रा आणि १६ घंटे जागृती’, असे निद्रा अन् जागृती यांचे २४ घंट्याचे चक्र असते.’

(क्रमश:)

– आधुनिक वैद्य दुर्गेश सामंत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (१७.१२.२०२४)