नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्वांतत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जन्मगाव भगूर येथे त्यांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्मारकासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्याची मागणी शिंदे-फडणवीस सरकारकडे केली आहे. २२ डिसेंबर या दिवशी पुरवणी मागण्यांवर विधानसभेत झालेल्या चर्चेत सहभाग घेतांना त्यांनी ही मागणी केली.
#वीरसावरकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्यासाठी आमदार सरोज अहिरे यांची 100 कोटींची मागणीhttps://t.co/77RcvNnq1J@CMOMaharashtra @RanjitSavarkar @SarojAhire113 @SavarkarSmarak @manjirismarathe #sarojahire #VeerSavarkar #Bhagur #NewsUpdate #SwatantryaVeerSavarkar
— Hindusthan Post Marathi (@HindusthanPostM) December 23, 2022
त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जन्मभूमी असलेले भगूर गाव माझ्या मतदारसंघात येते, याचा अभिमान वाटत आहे, तसेच सावरकरांचा जाज्वल्य इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर जनतेसमोर येण्यासाठी त्यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक भगूर गावात उभे राहिले पाहिजे. भगूर गावातील दारणा नदीतून दूषित पाणी वाहून येत असल्याने आरोग्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे त्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी एक प्रकल्प संमत करावा, अशी मागणी त्यांनी केली.