नम्र आणि स्वीकारण्याची वृत्ती असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या म्हापसा (गोवा) येथील सौ. मीनाक्षी अंकुश धुमाळ !

सौ. मीनाक्षी धुमाळ

कु. अनुराधा जाधव, फोंडा, गोवा.   

१. नम्रता

‘सौ. मीनाक्षीताई प्रत्येक व्यक्तीशी नम्रतेने बोलतात. त्यांच्या आवाजात चढ-उतार नसतो.

२. साधनेचे गांभीर्य

त्या नियमितपणे व्यष्टी आणि समष्टी साधना यांचा आढावा देतात.

३. स्वीकारण्याची वृत्ती

ताई प्रतिदिन घरून रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात सेवेसाठी येतात. मार्च २०२० मध्ये दळणवळण बंदी लागू झाल्यावर ताई रामनाथी आश्रमात जाऊ शकत नव्हत्या. खरेतर ‘आश्रमात जायला मिळत नाही’, हे त्यांच्यासाठी पुष्कळ अवघड होते; पण त्यावर त्यांनी सहजतेने मात करून परिस्थिती स्वीकारली.

४. तत्त्वनिष्ठ

अ. आरंभी साधकांना चुका सांगून त्यांना साधनेत साहाय्य करण्यासाठी त्यांच्यातील ‘भावनाशीलता’ हा स्वभावदोष आड येत होता; पण आता त्या तत्त्वनिष्ठ राहून साधकांना त्यांच्या चुकांची जाणीव करून देतात.

आ. एखाद्या वेळी माझ्याकडून भावनिक स्तरावर विचार होत असेल, तर त्या मला लगेच त्याची जाणीव करून देतात.’

कु. स्नेहल सोनीकर, सनातन आश्रम, गोवा.

१. सहजता

‘सौ. मीनाक्षीताई करत असलेल्या सेवेची व्याप्ती पुष्कळ मोठी आहे. ताई सतत सेवेत व्यस्त असतात. ताईंच्या चेहर्‍यावर कधीच सेवेत येणार्‍या अडचणींचा ताण दिसत नाही. ताई सहजतेने सर्व अडचणी सोडवतात.

२. आधार देणे

मी २ – ३ मासांपासून ताई करत असलेल्या सेवेशी संबंधित सेवा करते. मी ताईला मनाची प्रक्रिया मोकळेपणाने सांगते. ‘ताई अडचण सोडवणार’, याची मला निश्चिती असते. त्यामुळे मला त्यांचा आधार वाटतो.

३. ‘साधकांची साधना होते ना ?’, याकडे गांभीर्याने लक्ष देणे

ज्या दिवशी सेवेची व्यस्तता अधिक असणार असते, त्याच्या आदल्या दिवशीच ‘उद्या सकाळीच नामजप पूर्ण करून घे’, असे ताई मला सांगतात. एखाद्या दिवशी ‘आज माझा नामजप करायचा राहिला’, असे मी ताईंना सांगितल्यास ताई मला माझी सेवा आणि नामजप यांचे नियोजन करून देतात.’

(सर्व सूत्रांचा दिनांक २०.७.२०२१)