‘हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवणार्‍या कल्याणी देशपांडेला सक्तमजुरी !

पुणे – येथे ‘हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवत संघटित गुन्हेगारी करणार्‍या कुख्यात कल्याणी देशपांडे आणि तिचा सहकारी प्रदीप गवळी याला १९ डिसेंबर या दिवशी ७ वर्षे सक्तमजुरी आणि १० लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंडाची रक्कम न भरल्यास अतिरिक्त १ वर्षे कारावास भोगावा लागले, असे आदेशात म्हटले आहे. आरोपी कल्याणी देशपांडे यांना पिटा आणि मकोका गुन्ह्यात राज्यात प्रथमच अशाप्रकारे शिक्षा झाली आहे. अतिरिक्त सरकारी अधिवक्ता विजय फरगडे यांनी या प्रकरणात युक्तीवाद करतांना गुन्हा गंभीर स्वरूपाचा असून दोघांना अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी केली होती. सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि पुरावे ग्राह्य धरून न्यायालयाने ही शिक्षा सुनावली आहे.

येथील कोथरूड भागातील एका सोसायटीमध्ये ‘हायप्रोफाइल सेक्स रॅकेट’ चालवल्याप्रकरणी कल्याणी देशपांडे यांना ऑगस्ट २०१६ मध्ये अटक केली होती. शहरात संघटितपणे वेश्याव्यवसाय केल्याप्रकरणी कल्याणी देशपांडेवर संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली होती. या प्रकरणी देशपांडे यांच्यावर चतुःशृंगी, कोथरूड, विश्रांतवाडी, हिंजवडी आदी पोलीस ठाण्यात २० पेक्षा अधिक गुन्हे नोंद आहेत.