इंदूर आणि उज्जैन येथे मुसलमान तरुणांकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु महिलांचे लैंगिक शोषण

मध्यप्रदेशात ‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा असतांनाही ‘लव्ह जिहाद’च्या घटना चालूच !

इंदूर (मध्यप्रदेश) – मध्यप्रदेशातील इंदूर आणि उज्जैन येथे मुसलमान तरुणांकडून ‘हिंदु’ असल्याचे सांगून हिंदु तरुणी आणि महिला यांना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

१. उज्जैनच्या निलगंगा भागामध्ये एका २६ वर्षीय तरुणीने शादाब याच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली आहे. शादाब याची या तरुणीशी सामाजिक माध्यमांतून ओळख झाली होती. तेव्हा त्याने तो हिंदु असल्याचे आणि त्याचे नाव राजा असल्याचे सांगितले होते. काही मासांच्या मैत्रीनंतर त्याने या तरुणीला अजमेर येथे फिरण्यासाठी नेले. तेथे या तरुणीला तो मुसलमान असल्याचे लक्षात आले. या काळात त्याने या तरुणीचे लैंगिक शोषण केले. नंतर त्याने धर्मांतर करून विवाह करण्यासाठी तरुणीवर दबाव आणला. तसेच ‘श्रद्धा वालकरप्रमाणे तुझी हत्या करून तुकडे करणार’, अशी तो धमकी देत होता. या प्रकरणाची माहिती हिंदु संघटनांना मिळाल्यावर त्यांच्या साहाय्याने या तरुणीने पोलिसांत तक्रार केल्यावर पोलिसांनी शादाब याला अटक केली.

२. इंदूर येथील घटनेत घटस्फोटीत हिंदु महिलेला बिहारच्या नबील शेख याने तो ‘नवीन’ असल्याचे सांगून तिच्याशी मैत्री केली होती. नंतर विवाह करण्याचे आमीष दाखवून तिचे लैंगिक शोषण केले. नबील याने या महिलेला धर्मांतर करण्यास सांगितले. तसेच हे मान्य न केल्यास तिला आणि तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

धर्मांधांना कायद्याची भीती नसल्याने त्यांना शरीयत कायद्यानुसार कमरेभर खड्ड्यात गाडून त्यांच्यावर दगडफेक करून त्यांना ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्‍चर्य वाटू नये !