चीनमध्ये शून्य कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोकांना कोरोनाची लागण !

पुढील ९० दिवसांत लाखो लोकांच्या मृत्यूची शक्यता !

बीजिंग (चीन) – चीनमध्ये शून्य कोविड धोरणात सवलत दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कोरोनाचा संसर्ग झाला आहे. येथील रुग्णालयांतील सर्व खाटा भरल्या असून अनेक ठिकाणी औषधे नाहीत आणि आहेत तेथे लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र आहे.  बीजिंगमधील स्मशानभूमीत २४ घंटे अंत्यसंस्कार केले जात आहेत, तसेच २ सहस्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार होणे शेष आहे. तज्ञांच्या मते चीनमध्ये कोरोनाची प्रकरणे दिवसात नव्हे, तर घंट्यांमध्ये दुप्पट होत आहेत. विशेष म्हणजे चीनमध्ये ८० टक्के लोकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे सर्व डोस घेतलेले आहेत.

अमेरिकी शास्त्रज्ञ आणि महामारी तज्ञ एरिक फेगल-डिंग यांनी चेतावणी दिली आहे की, पुढील ९० दिवसांत चीनच्या ६० टक्के लोकसंख्येला आणि जगातील १० टक्के लोकसंख्येला कोरोनाची लागण होईल. यात जवळपास १० लाख लोकांचा मृत्यू होण्याचीही शक्यता आहे.