अमरावती येथे हिंदु धर्म संरक्षण मुक मोर्चा

अमरावती येथे हिंदु धर्म संरक्षण मुक मोर्चामध्ये सहभागी हिंदू

अमरावती – येथे भव्य विराट हिंदु धर्मरक्षण मुक मोर्चा धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज बलीदान मास अभिवादन समितीच्या वतीने काढण्यात आला. यामध्ये हजारो हिंदूंनी सहभाग घेतला. या मोर्च्यामध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान, विश्व हिंदु परिषद, हिंदू हुंकार, बजरंग दल, राजपूत करणी सेना, श्रीराम सेना, केसरी सेना, हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था सहभागी झाल्या होत्या.

मागील काळात हिंदु धर्मातील अनेक व्यक्तींचे  फसवणूक करून धर्मांतर करून घेतल्याचे आढळून येत आहे. हिंदू मुलींना खोट्या प्रेमाचे जाळ्यात ओढून लग्नाच्या आमिषाने त्यांचे धर्मांतर करून विवाह केल्याची प्रकरणे समोर आली आहेत. लव्ह जिहादच्या माध्यमातून सहस्रो हिंदु मुली धर्मांतर करून इतर धर्मांत पळवून नेल्या आहेत. यांपैकी कित्येक मुलींच्या हत्या होत असूनही याची गांभीर्याने नोंद घेतली गेली नाही. याला आळा घालण्यासाठी अमरावती जिल्ह्यातील सकल हिंदु समाजाच्या वतीने मोर्चा काढून जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.

या वेळी करण्यात आलेल्या मागण्या

१. लव्ह जिहादविरोधी कडक कायदा बनवून ही सर्व प्रकरणे हाताळण्याकरिता विशेष न्यायालयाची नियुक्ती करावी.

२. वरील विषयांकरिता एक स्वतंत्र विभागाची स्थापना करावी. अनधिकृत धर्मांतरावर बंदी आणावी.

३. संपूर्ण देशामध्ये गोवंश हत्याबंदी कायद्याची काटेकोरपणे कार्यवाही होण्याकरिता स्वतंत्र विभाग स्थापन करावा.