सुनावणीला उपस्थित रहाण्यासाठी न्यायालयाकडून गीतकार जावेद अख्तर यांना समन्स !

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तालिबानी आतंकवाद्यांची तुलना केल्याचे प्रकरण

डावीकडे गीतकार जावेद अख्तर

मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तुलना तालिबानी आतंकवाद्यांशी केल्याच्या प्रकरणी मुलुंड येथील न्यायालयाने गीतकार जावेद अख्तर यांना ६ जानेवारी या दिवशी सुनावणीसाठी न्यायालयात उपस्थित रहाण्याविषयी समन्स पाठवला आहे.

ऑगस्ट २०२१ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी तालिबानींसारखी आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोकांची दिशाभूल करतो’, असे वक्तव्य केले होते. या विरोधात अधिवक्ता संतोष दुबे यांनी न्यायालयात फौजदारी तक्रार प्रविष्ट केली होती. अख्तर यांनी केवळ राजकीय लाभासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव वादात अनावश्यक ओढल्याचे अधिवक्ता संतोष दुबे यांनी तक्रारीत म्हटले आहे.