रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात रहाणार्या सनातन संस्थेच्या ९५ व्या व्यष्टी संत पू. (श्रीमती) कुसुम जलतारेआजी (वय ८३ वर्षे) यांचे भाऊ आणि फोंडा (गोवा) येथील श्री. अनिरुद्ध राजंदेकर (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के) यांचे मोठे काका अकोला येथील श्री. विनायक राजंदेकर (वय ८० वर्षे) हे ४ ते ८.९.२०२२ या कालावधीत गोवा येथे आले होते. रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील एका सत्संगात त्यांच्याकडे बघून नातेवाइकांना आणि इतर साधकांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. ‘श्री. विनायक राजंदेकर काकांकडे बघितल्यावर शांत आणि स्थिर वाटले. ‘त्यांच्या अंतर्मनात आध्यात्मिक स्तरावर काहीतरी प्रक्रिया चालू आहे’, असे जाणवले.’ – सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (श्री. विनायक राजंदेकरकाकांची सून) (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के)
२. ‘मोठ्या आजोबांकडे बघून भाव जाणवला आणि मन स्थिर झाले.’ – कु. श्रिया अनिरुद्ध राजंदेकर (श्री. विनायक राजंदेकर काकांची नात) (वय ११ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के)
३. ‘मोठ्या आजोबांना बघितल्यावर भाव जाणवला.’ – पू. वामन राजंदेकर (श्री. विनायक राजंदेकरकाकांचे नातू आणि सनातनचे दुसरे बालकसंत) (वय ३ वर्षे)
४. ‘काकांना बघितल्यावर स्थिरता जाणवून ‘त्यांचे अस्तित्वच नाही’, असे जाणवले.’ – श्री. अनिरुद्ध राजंदेकर (श्री. विनायक राजंदेकरकाकांचा पुतण्या) (वय ३९ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६० टक्के)
५. ‘मामांच्या जीवनात अनेक अडचणी, तसेच कठीण प्रसंग येऊनही त्यांची देवावरील श्रद्धा दृढ आहे’, याची जाणीव झाली.’ – श्री. योगेश जलतारे (श्री. विनायक राजंदेकरकाकांचा भाचा)
६. ‘काकांना बघून ते शांत आणि समाधानी वाटले. ‘त्यांची पूर्वजन्मीची शिवाची उपासना आहे’, असे जाणवले. प्रथमच पाहून सुद्धा ‘ते जवळचे आहेत’, असे जाणवले.’ – सत्संगाला उपस्थित इतर साधक
(सर्व सूत्रांचा दिनांक १८.९.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |