‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा ! – नीलेश टवलारे, हिंदु जनजागृती समिती

बल्लारशा (जिल्हा चंद्रपूर) येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

सभेला उपस्थित धर्मप्रेमी

बल्लारशा (जिल्हा चंद्रपूर) – हलाल अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून गोळा होणारा पैसा हा आतंकवादासाठी वापरला जात आहे. ‘जमियत उलेमा-ए-हिंद’ बाँबस्फोटांत सहभागी मुसलमान आरोपींना कायदेशीर साहाय्य करत आहे. भारतीय अर्थव्यवस्था तथा सुरक्षा यांना धोका निर्माण करणार्‍या ‘हलाल’ उत्पादनांवर हिंदूंनी बहिष्कार टाकावा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश टवलारे यांनी केले. येथे झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी रणरागिणी शाखेच्या सौ. भार्गवी क्षीरसागर यांनी ‘लव्ह जिहाद’ला मिटवण्यासाठी स्वसंरक्षण प्रशिक्षण घेणे आणि साधना करणे हीच काळाची आवश्यकता आहे’, असे मार्गदर्शन केले. सभेसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटना, कार्यकर्ते यांसह धर्माभिमानी हिंदू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

क्षणचित्रे : श्री. गोपाल रेड्डी आणि श्री. संजय पारधी यांनी सभेच्या प्रसारात सहकार्य केले. भविष्यात मोठी सभा घेण्याविषयीही या वेळी सर्वांनी सांगितले.