कळंबोली येथे वाहनफेरीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र-जागृती सभेचा प्रसार !

कळंबोली, २० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसारासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वाहनफेरीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे श्री. मयूर उथळे यांनी शंखनाद केला. त्यानंतर फेरीला आरंभ करण्यात आला. हिंदुत्वनिष्ठ आणि पत्रकार श्री. दीपक घोसाळकर यांच्या हस्ते धर्मध्वजाचे पूजन करण्यात आले. ‘गौरव क्लासेस’चे संचालक श्री. संतोष वर्तक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवण्यात आले. समितीचे रायगड जिल्हा समन्वयक श्री. राजेंद्र पावसकर आणि रणरागिणी शाखेच्या कु. शीतल चव्हाण यांनी राष्ट्र-जागृती सभेमागील उद्देश सांगून सभेला उपस्थित रहाण्याचे आवाहन केले.

वाहनफेरीत भगवे ध्वज लावून सहभागी झालेले धर्मप्रेमी

क्षणचित्र – वाहनफेरीसह सभेच्या पूर्वसिद्धतेत ‘गौरव क्लासेस’च्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.