राष्ट्र आणि धर्म यांसाठी स्वतःसह कुटुंबियांचे योगदान देणारे ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. विजय (नाना) वर्तक (वय ७७ वर्षे) !

विजय (नाना) वर्तक यांचा आज (२०.११.२०२२) निधनानंतरचा १२ वा दिवस आहे. त्या निमित्ताने…

‘वर्ष १९९२ मध्ये माझा श्री. विजय (नाना) वर्तक यांच्याशी संपर्क झाला. डिसेंबर १९९२ मध्ये प.पू. डॉ. आठवले (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) यांचा रायगड जिल्ह्यातील पहिला अध्यात्मप्रचार दौरा होता. त्या वेळी आम्ही नागोठणे येथे नानांच्या घरी निवासाला होतो. तेव्हापासून माझा अधूनमधून त्यांच्याशी संपर्क होत असे. मला नानांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

कै. विजय वर्तक

१. ते मनाने निर्मळ आणि प्रांजळपणे वागणारे होते.

२. नानांनी त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर केवळ व्यावहारिक जीवन न जगता आध्यात्मिक आणि व्रतस्थ जीवन जगले.

३. प.पू. डॉ. आठवले यांचा जन्म नागोठणे येथे नानांच्या घरी झाला आहे. त्यांनी प.पू. डॉ. आठवले यांचा जन्म झालेल्या घराचे भावपूर्ण जतन केले आहे.

४. स्वतःचा मुलगा आणि सून यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणे : नानांनी त्यांचा एकुलता एक मुलगा श्री. अभय वर्तक (सनातन संस्थेचे धर्मप्रचारक) आणि सून सौ. रूपाली यांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन दिले.

पू. शिवाजी वटकर

५. नाना माझे दैनिक ‘सनातन प्रभात’ मध्ये प्रसिद्ध झालेले लिखाण वाचल्यावर माझे कौतुक करून मला प्रोत्साहन द्यायचे.

६. राष्ट्र आणि धर्म यांविषयी परखड मत मांडणे : नाना अध्यात्मप्रचारात कृतीशील भाग घेत असत. ते प्रखर राष्ट्र आणि धर्म प्रेमी होते. ते राष्ट्र आणि धर्म यांविषयी लिखाण करून स्वतःचे हिंदु धर्माविषयी परखड मत मांडायचे. त्यांनी धर्मप्रचारासाठी स्वतःचे जीवन वाहून घेतले होते.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी अध्यात्मप्रसार, राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण यांसाठी योगदान देणारे श्री. नाना वर्तक यांची आध्यात्मिक प्रगती करून घेतली आणि यापुढेही ‘त्यांची आध्यात्मिक प्रगती होवो’, अशी ईश्‍वरचरणी प्रार्थना करतो.’

– (पू.) शिवाजी वटकर (वय ७५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (११.११.२०२२)