‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ला समर्थन आणि राष्ट्रहिताला लाथ !

केंद्रशासनाकडून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.)’ आणि या संघटनेशी संलग्न असलेल्या अन्य ८ संस्था यांच्यावर बंदी घालण्यात आली. याचे अनेकांना दुःख झाले. त्यांनी पी.एफ्.आय.चा कैवार घेतला आणि राष्ट्रहिताला लाथाडले. हे करतांना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला ‘राष्ट्रघातक’ संघटना ठरवले. पी.एफ्.आय. या संघटनेला सोज्वळ संघटना ठरवून मोकळे झाले.

श्री. दुर्गेश परुळकर

१. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुसलमानांच्या फुटीरता वृत्तीकडे दुर्लक्ष आणि परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण करण्यात येणे

पी.एफ्.आय. या संघटनेचा कैवार घेणारे लोक कसे आहेत, याची प्रचीती भारतियांना वारंवार आली आहे. या मंडळींनी पी.एफ्.आय.ला अनुकूल वातावरण देशात निर्माण होण्यासाठी कशा प्रकारे योजनाबद्ध काम केले, तेही आपण जाणतो. निधर्मीवाद्यांनी मुसलमानांना अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी देश स्वतंत्र होण्यापूर्वीच हिंदु समाजाचा द्वेष करण्यास आरंभ केला. देश स्वतंत्र झाल्यावर मुसलमानांच्या फुटीरता वृत्तीकडे दुर्लक्ष केले.

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पालटायला प्रारंभ केला. त्यांना ‘सेक्युलर’ (निधर्मी) ठरवण्यात आले. एवढेच नव्हे, तर अफझलखानाला ‘राष्ट्रपुरुष’ ठरवण्याचा घाट घातला गेला. अफझलखान वधाचे चित्र सार्वजनिक ठिकाणी लावण्यास बंदी घालण्यात आली. परकीय आक्रमकांचे उदात्तीकरण करण्यात आले. सर्व इस्लामी क्रूर राज्यकर्त्यांना दयाळू, कनवाळू, ममताळू, मानवतेचे पुजारी म्हणून गौरवले गेले.

२. राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणारे राष्ट्रभक्त असल्याचे पी.एफ्.आय.च्या समर्थकांनी म्हणणे

मध्यप्रदेशात हिंदूंना ‘वसंत पंचमी’ हा सण साजरा करतांना अनेक बंधने घालण्यात आली. शुक्रवारी वसंत पंचमी आली असेल, तर मुसलमानांना नमाज पठणासाठी अनुमती देण्यात आली; पण हिंदूंना वसंत पंचमी साजरी करण्यासाठी अनुमती दिली जात नव्हती. मशिदीच्या समोरून हिंदूंची मिरवणूक नेण्यास अनुमती दिली जात नाही.

पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणांकडे दुर्लक्ष केले जाते. राष्ट्रगीताचा मान न राखणार्‍या मुसलमानांवर पी.एफ्.आय.चा कैवार घेणार्‍या लोकांकडून टीका केली जात नाही. ‘राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत यांचा अवमान करणारे राष्ट्रभक्त आहेत’, असे तर्कहीन विधान करणारेच पी.एफ्.आय.ची बाजू घेत आहेत.

३. पी.एफ्.आय.चा कैवार घेणार्‍यांनी ‘मुसलमानांनी भारताचा अभिमान बाळगावा’, असे सांगण्याचे धाडस कधीही न करणे

ही आणि अशी अनेक उदाहरणे आपल्याला देता येतील. ‘मुसलमानांनी या राष्ट्राचा अभिमान बाळगला पाहिजे’, असे त्यांना सांगण्याचे धाडस आज पी.एफ्.आय.चा कैवार घेणार्‍या लोकांनी कधी केले नाही. ‘या देशाची ऐतिहासिक परंपरा मुसलमानांनी जतन केली पाहिजे. ते त्यांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव मुसलमान समाजाला होईल’, असे वर्तन पी.एफ्.आय.चे समर्थन करणार्‍या एकाही नेत्याने केले नाही.

४. याच मंडळींनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनाच देशद्रोही ठरवण्यासाठी आटापिटा केला. सावरकर यांचा स्वीकार केला, तर मुसलमानांच्या राष्ट्रघातक कृत्यांचे समर्थन करता येणार नाही. त्यापेक्षा सावरकर यांना कलंकित करणे त्यांना लाभदायक वाटले.

५. हिंदु असहिष्णु आणि आतंकवादी असल्याचा अपप्रचार पी.एफ्.आय.च्या समर्थकांनी करणे

पाकिस्तान हे भारताचे शत्रूराष्ट्र आहे’, याचा विसर या मंडळींना पडला. ‘हिंदूंनी फक्त अन्याय सहन करायचा. त्यांच्यावर झालेल्या अन्यायाविरुद्ध त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही आणि त्यांनी अन्यायाविरुद्ध लढायचे नाही’, असा एक अलिखित कायदा त्यांनी अस्तित्वात आणला. ‘मुसलमान हे सहिष्णु आणि शांततेचे भोक्ते आहेत. हिंदु असहिष्णु आणि आतंकवादी आहेत. त्यांनीच देशात आतंकवाद निर्माण केला’, असा अपप्रचार केला, तसेच ‘पी.एफ्.आय.सारख्या संघटनांच्या राष्ट्रघातक कृत्यांकडे देशाचे लक्ष वेधले जाणार नाही’, याची त्यांनी काळजी घेतली.

६. केंद्रशासनाने पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यावर तिच्या समर्थकांनी रा.स्व. संघाला कलंकित करणे

विद्यमान केंद्रशासनाने पी.एफ्.आय.च्या राष्ट्रघातक कारवायांना आळा घालण्यासाठी तिच्यावर बंदी घातली. त्यामुळे पी.एफ्.आय. संघटनेला पाठबळ देणार्‍या लोकांची अडचण झाली. आता त्यांना पी.एफ्.आय.ची काळजी वाटू लागली. त्या संघटनेच्या भोवती याच मंडळींनी निर्माण केलेले संरक्षण कवच केंद्रशासनाने भेदले. या संघटनेचे अंतरंग प्रकाशात आणले. त्यामुळेच त्यांचा थयथयाट चालू आहे.

शासनाच्या या कारवाईमुळे बिथरलेल्या या मंडळींनी रा.स्व. संघासारख्या सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने आणि निरपेक्ष भावनेने काम करणार्‍या संघटनेला कलंकित करण्याचा सपाटा लावला. समाजामध्ये राष्ट्रभक्ती जागृत करण्याचे कार्य संघाने स्थापनेपासून आरंभले आहे. ही शिस्तबद्ध, राष्ट्रप्रेमी आणि भारतीय संस्कृतीची परंपरा जतन करणारी संघटना आहे. या संघटनेचे कौतुक म. गांधी,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, जयप्रकाश नारायण अशा अनेकांनी केले आहे. नैसर्गिक आपत्तीत आपल्या बांधवांना साहाय्य करण्यासाठी आघाडीवर असलेला रा.स्व. संघ देशातील बांधवांना आधार देणारा आहे.

७. पी.एफ्.आय.चे समर्थन करणार्‍यांना देशद्रोहाची शिक्षा करणे आवश्यक !

पी.एफ्.आय. ही विष पसरवणारी आणि देशाच्या सार्वभौमत्वावर आघात करणारी आहे. अशा संघटनेचा कैवार घेणे, म्हणजे आपणच स्वतःच्या घराला आग लावण्यासारखे आहे. विषवृक्षाला जशी अमृताची फळे येत नाहीत, त्याप्रमाणे राष्ट्रघातकी कार्य करणार्‍या पी.एफ्.आय.सारख्या कोणत्याही संघटनेकडून स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व यांची मधुर फळे नागरिकांना चाखता येणार नाहीत. ही गोष्ट ज्यांचा विवेक जागा आहे, त्यांच्या लक्षात येईल. केवळ अविवेकी आणि आत्मघातकी लोकच रा.स्व. संघाकडे ‘दानव’ म्हणून पहातील. या देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करण्याचा प्रयत्न करणार्‍या कोणत्याही संघटनेचे कुणालाही समर्थन करता येणार नाही. जो असे समर्थन करील, तोच देशद्रोही म्हणून शिक्षेस पात्र ठरेल, हे निश्चित !

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.

संपादकीय भूमिका

देशाचे इस्लामी राष्ट्रात रूपांतर करू पहाणार्‍या जिहाद्यांना तात्काळ कठोर शिक्षा सुनावून त्याची प्रभावी कार्यवाही करा !